ठाणे महापालिकेच्या यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष, वाहत्या ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे विवाह नोंदणीकरणारे दांपत्य हैराण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:29 PM2019-01-31T18:29:35+5:302019-01-31T18:38:02+5:30
नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव दिसून आले. सुमारे एक महिन्यांपासून मासुंदा तलावजवळील भर रस्त्यात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. येथून भरधाव वेगाने येणाºया वाहनांकडून ते अंगावरही उडत आहे. याशिवाय जीव घेणी दुर्गंधी असल्यामुळे सेन्ट जॉन बाप्पष्ठीस शाळेच्या विद्यार्थ्यांसह तलावाच्या काठी फिरणाºया नागरिकाना त्रास होत आहे.
ठाणे : स्वच्छेसाठी देशात युध्दपातळीवर जनजागृती सुरू आहे. मात्र स्मार्ट सीटीच्या उंबरठ्यावरील ठाणे महापालिकेच्या यंत्रणेकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, याचे वास्तव मासुंदा तलावाजवळील रस्त्यावर वाहणाऱ्याड्रेनेजमुळे उघड होत आहे. याड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे येथील विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या नवदाम्पत्यांसह विद्यार्थी व तलावा काठी फेरफटका मारणारे हैराण आहेत.
नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत
असल्याचे वास्तव दिसून आले. सुमारे एक महिन्यांपासून मासुंदा तलावजवळील भर रस्त्यात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. येथून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांकडून ते अंगावरही उडत आहे. याशिवाय जीव घेणी दुर्गंधी असल्यामुळे सेन्ट जॉन बाप्पष्ठीस शाळेच्या विद्यार्थ्यांसह तलावाच्या काठी फिरणाऱ्या नागरिकाना त्रास होत आहे.
विवाह नोंदणी निबंधक कार्यालयही येथे असल्यामुळे या वाहत्या ड्रेनेजचा त्रास नोंदणी करण्यासाठी येणारे नवदांम्पत्य व त्यांच्या नातेवाईकाना होत आहे. गडकरी रंगायतनच्या प्रेक्षकानाही त्याचा त्रास होत आहे. याशिवाय या ड्रेनेजचे साठलेले पाणी जवळच्या मासुंदा तलावत जाण्याची शक्यता येथील प्रथमदर्शी जेष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी व्यक्त केली. या वाहत्याड्रेनेजच्या पाण्यास वेळीच आळा घालण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या संबंधीत यंत्रणेला पाचारण केले. पण त्यांनी ड्रेज तात्पुरते साफ केले. पण ते तेथून जाताच पुन्हा रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. याकडे लक्ष केंद्रीत करून गांभीर्य लक्षात आणून देणारे लेखी निवेदन मोने यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देऊन गांभीर्य निदर्शनात आणून दिले आहे.
सेन्ट जॉन बाप्पष्टीस चर्चच्या समोरच मासूंदा तलावाच्या कठड्याचे दुरूस्तीचे काम चालू आहे. तेथेच बाजूला हे दोन ड्रेनेज वाहत आहेत. हेवी ट्रॅफिक असलेल्या या रस्त्यावर विवाह निबंधकाचे कार्यालय आहे . येथे विवाह नोंदणी करीता येणाऱ्या नागरिकांना याच पाण्यातून मार्गक्रमण करून दुर्गंधीस सामोरे जावे लागते आहे. तेथे लावलेली खबरदारीचा फलकही अत्यंत बेजबाबदार भाषेत आहे. हे काम किती दिवस चालणार, या कामाचा कार्यादेश क्र मांक काय आहे, कोण कंत्राटदार हे काम करीत आहे, कीती खर्च अपेक्षीत आहे, आपत्कालीन परिस्थितीत कोणास संपर्करावा, महापालिकेकडून कोण अभियंता या कामावर देखरेख करीत आहे , त्याचा भ्रमणध्वनी क्र मांक आदी माहीती देणारा फलक तेथे लावण्यात आलेला नाही.
..........