ठाणे महापालिकेचा अनधिकृत लॉजवर हातोडा, रहिवास क्षेत्रात लॉजचा मांडला होता थाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 06:02 PM2017-09-29T18:02:02+5:302017-09-29T18:09:11+5:30
मागील काही महिन्यापूर्वी उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई केल्याची घटना ताजी असतांनाच घोडबंदर भागात हायवेच्या बाजूलाच असलेल्या काव्या या रहिवास इमारतीमध्ये अंतर्गत बदल करुन लॉजचा व्यवसाय सुरु ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने शुक्रवारी केलेल्या कारवाईत पुढे आली आहे.
ठाणे - मागील काही महिन्यापूर्वी उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई केल्याची घटना ताजी असतांनाच घोडबंदर भागात हायवेच्या बाजूलाच असलेल्या काव्या या रहिवास इमारतीमध्ये अंतर्गत बदल करुन लॉजचा व्यवसाय सुरु ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने शुक्रवारी केलेल्या कारवाईत पुढे आली आहे. तळ अधिक सहा मजल्याच्या इमारतीत तब्बल 45 रुम अशा प्रकारे तयार करण्यात आल्या असून त्यावर पालिकेने हातोडा टाकला आहे.
ठाणो महापालिकेच्या वतीने शुक्रवारी तिस-या दिवशीही शहरातील अनधिकृत बार, लॉज, लाऊन्स, हुक्का पार्लर आदींवर कारवाई सुरुच होती. शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा घोडबंदर भागाकडे वळविला. यावेळी सिनेवंडरमधील आयकॉन हा बार सील करण्यात आला. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा पुढेच हायवेलाच असलेल्या काव्या या इमारतीकडे आपला मोर्चा वळविला. या इमारतीमध्ये अनाधिकृतपणो लॉज सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाला होती. त्यानुसार येथे कारवाई करण्यासाठी गेले असता, याठिकाणी दोन फ्लॅटमध्ये अंतर्गत बदल करुन चक्क आठ रुम तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई करीत असतांना देखील अशाच प्रकारे पालिकेला या लॉजमधील अंतर्गत बाबीत केलेले गडाब सापडले होते. त्यानंतर आता पुन्हा अशा पध्दतीने रहिवास इमारतीतच अंतर्गत बदल करुन लॉज थाटण्यात आल्याची माहिती या कारवाईच्या माध्यमातून समोर आली आहे.
तळ अधिक सहा मजल्याची इमारत बाहेरुन अतिशय पॉश वाटते. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर आठ रुम आढळले असून त्यानुसार पाच मजल्यांवर 40 आणि सहाव्या मजल्यावर पार्टली 5 रुम अशा पध्दतीने तब्बल 45 रुम या इमारतीत आढळून आले आहेत. त्यानुसार या इमारतीमधील अंतर्गत रचनेत करण्यात आलेले बदल वाढीव रुम यावर पालिकेने हातोडा टाकला आहे. दरम्यान या कारवाईच्या वेळेस संतोष पुत्रन यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांना कारवाईसाठी मज्जव केला. तसेच दमदाटी आणि धमकीही दिली. त्यामुळे त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती बुरपुल्ले यांनी दिली.
हायवेला लागून असलेल्या काव्या या इमारतीत अशा पध्दतीने लॉज सुरु होता, याची माहिती आता उघड झाली आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून ही इमारत या ठिकाणी उभी असून येथे लॉज असल्याची तुस भरही कल्पना हाकेच्या अंतरावर असलेल्या मानपाडा पोलिसांना नव्हती का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.