ठाणे महापालिकेचे स्टारग्रेड अॅप आता नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:07 PM2018-07-02T17:07:34+5:302018-07-02T17:08:59+5:30
ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत.
ठाणे - रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु करण्यात आलेल्या स्टार ग्रेड अॅप बंद होते. परंतु आता ते नव्या स्वरुपात, नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी मंगळवार पासून रुजु होणार आहे. या अॅपवर केवळ खड्यांच्याच तक्रारी करता येणार नसून, शौचालय, गार्डन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे इतर विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, अग्निशनम विभाग आदींसह इतर महत्वाच्या विभागांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एका क्लिकवर ठाणेकरांना आता आपल्या समस्या सोडविण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि हे खड्डे बुजविण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, या बाबत पालिकेने मागील तीन वर्षापूर्वी स्टार ग्रेड नावाचे अॅप सुरु केले होते. अॅपवर आलेल्या तक्रारींवर तत्काळ संबधींत विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कारवाई कोणत्या टप्यात आहे याची माहिती देखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर खड्डा बुजल्यावर देखील त्याचा फोटा अथवा माहिती म्हणजेच तुमच्या तक्रारीवर काम पूर्ण झालेले असा मेसेज पाठविला जात होता. त्यामुळे शहरातील खड्यांवर पालिकेने या अॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते. या अॅपसाठी पालिकेने तब्बल ४५ लाखांचा खर्च केला होता. परंतु संबधींत एजेन्सीचा ठेका संपुष्टात आल्याने हे अॅप बंद मागील काही महिने बंदच होते. परंतु आता नव्या दमात, नव्या स्वरुपात पालिकेने हे अॅप सुरु केले आहे. आता याचे अपडेट व्हर्जन ठाणेकरांच्या भेटीला मंगळवार पासून येणार आहे.
या अॅपवर आता केवळ खड्यांच्याच नाही तर, शौचालयाचे दरवाजे तुटले, ओव्हरफ्लो झाले असेल, लाईट, पाण्याची सुविधा नाही, आदींच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. शिवाय अग्निशमन विभाग, महत्वाचे म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आदींसह इतर महत्वाच्या विभागांचा देखील यात आता समावेश करण्यात आला आहे. आधी तक्रार केल्यानंतर, संबधींत विभागाकडे ती उशिराने पोहतच होती. परंतु आता तुम्ही या अॅपवर एखादी तक्रार केली तर ती थेट त्याच विभागाच्या संबधींत कार्यकारी अभियंत्याकडे जाणार आहे. त्यामुळे त्यावर तोडगा देखील तत्काळ निघणार आहे. हे अॅप केवळ खड्यांसाठी होते, त्यामुळे आता इतर विभाग देखील त्यात समाविष्ट करण्यात आल्याने त्या विभागांच्या कशा, कोणत्या स्वरुपाच्या तक्रारी येणार याचा देखील अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.