ठामपा अधिकारी कर्मचारी यांनी घेतली 'पंचप्रण शपथ'

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 9, 2023 05:48 PM2023-08-09T17:48:34+5:302023-08-09T17:49:48+5:30

हातात माती व पणती घेवून शूरवीरांना वाहिली आदरांजली

thane municipal officer staff took panch pran oath | ठामपा अधिकारी कर्मचारी यांनी घेतली 'पंचप्रण शपथ'

ठामपा अधिकारी कर्मचारी यांनी घेतली 'पंचप्रण शपथ'

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने ‘ मेरी मिटटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियानातंर्गत आज ठाणे महानगरपालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हातात माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण केली, तर देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांना हातात पणती घेवून आदरांजली अर्पण करण्यात आली.

या अभियानात अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयांमध्ये, नाट्यगृहे, अग्निशमन केंद्र, शाळा, टीएमटी बस आगार या ठिकाणी देखील हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात मोठ्या संख्येने ठाणे महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाली होते.

यावेळी, भारतास 2047 पर्यत 'आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू,' 'गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू', 'देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू', 'भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू', 'देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू' अशी 'पंचप्रण शपथ' सर्वांना देण्यात आली. या अभियानात मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. ‘मेरी मिटटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या अभियानातंर्गत 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.00 वा. महापालिका मुख्यालय येथे ध्वजारोहण होणार आहे. तद्नंतर सकाळी 10.00 वा. वसुधा वंदन या उपक्रमातंर्गत् 75 देशी प्रजाती रोपट्यांची लागवड माजिवडा- मानपाडा येथील कोलशेत तलावाजवळ केली जाणार आहे. तर सकाळी 11.00 वा. ठाणे महापालिका क्षेत्रातील देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे ठामपा शाळा क्र. 22 /33 च्या प्रांगणात शिलाफलकावर लिहिली असून या शिलाफलकाचे अनावरण केले जाणार आहे.

या उपक्रमातील मुख्य सोहळा शनिवार, 12 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न होणार आहे. दुपारी 12.00 वा. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान केला जाणार असून या कार्यक्रमास त्यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. ‘मेरी मिटटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या अभियानातंर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणची वंदन केलेली माती गोळा करून ठाणे शहराचा एक कलश तयार केला जाणार असून हा कलश दिल्ली येथे 27 ते 30 ऑगस्ट या काळात होणाऱ्या समारंभासाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Web Title: thane municipal officer staff took panch pran oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे