ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या होणार डीजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:46 PM2017-12-16T16:46:50+5:302017-12-16T16:50:25+5:30

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आखलेल्या कार्यक्रमानुसार आता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Thane Municipal Primary School will have 145 class rooms in the district | ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या होणार डीजीटल

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या होणार डीजीटल

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे होणार मुल्यमापन१४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी केले जाणार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. राज्य पातळीवर होणाऱ्या  शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला पहिल्या तीन क्र मांकात स्थान मिळवून देणे तसेच दहावी पर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणणे यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्र म हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील हे पाऊल उचलले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला काही उद्दीष्ट दिली आहेत. त्यामध्ये सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा या अनुक्रमे ५०टक्के आणि २५ टक्के करणे या उद्दीष्टाचा समावेश आहे. याशिवाय, माध्यमिक शाळा २० टक्के प्रगत करणे, जिल्ह्यातील किमान ३०० शाळांना ‘अ’ दर्जामध्ये आणणे, मोबाईल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे, दप्तराचे ओझे कमी करणे, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदींचा त्यात समावेश आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण १२९ प्राथमिक शाळा असून त्यापैकी २१ शाळेतील १४५ वर्ग डिजीटल करण्यात येणार आहेत. या वर्ग खोल्या ‘ब’ श्रेणीमध्ये असल्याने त्यांना ‘अ’ श्रेणीत आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उर्वरीत वर्ग खोल्या टप्याटप्याने डिजीटल करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्र मासाठी दोन कोटी दोन लाख रु पये इतका खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामध्ये अप्रगत शाळांनी प्रगत झालेल्या शाळांना भेटी देणे, राज्यातील प्रत्येक वर्ग डिजीटल करणे, शंभर टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, शंभर टक्के संकल्पनांवर ई-साहित्य तयार करणे, एक स्टेप या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे, शाळा सिद्धी या पोर्टलवर स्वमुल्यमापन तसेच इतर कार्यक्रमांचा यात समावेश आहे. या कार्यक्र मांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांसाठी संगणक आणि प्रिंटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.


 

Web Title: Thane Municipal Primary School will have 145 class rooms in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.