Thane: देशातील नामवंत चित्रकारांचे ‘नास्तिकता’ विषयावर राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन!
By सुरेश लोखंडे | Published: October 20, 2023 04:49 PM2023-10-20T16:49:53+5:302023-10-20T16:50:17+5:30
Thane: देशभरातील नामवंत चित्रकारांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन येथील तीन हात नाक्यावरील बाळासाहेब ठाकरे स्मारक कलादालनात २१ ते २३ ऑक्टाेंबर या तीन दिवसांसाठी ठाणेकरांनासह कला प्रमींसाठी खास भरवण्यात येत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे - देशभरातील नामवंत चित्रकारांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन येथील तीन हात नाक्यावरील बाळासाहेब ठाकरे स्मारक कलादालनात २१ ते २३ ऑक्टाेंबर या तीन दिवसांसाठी ठाणेकरांनासह कला प्रमींसाठी खास भरवण्यात येत आहे. ब्राईट्स सोसायटीकडून भरवण्यात येत असलेल्या चित्रांची निवड कलाक्षेत्रातील कथितयश परीक्षकांनी केलेली आहेत.
येथील 'बाईट्स सोसायटी' या बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांच्या नोंदणीकृत संस्थेमार्फत वेळाेवेळी अनेक सामाजिक उपक्रम, मेळावे, परिषदा, प्रदर्शनं आयोजित केले जातात. यंदाही त्यांनी या देशभरातील नामवंत चित्रकारांच्या कुचल्यातून साकारलेल्या ‘नास्तिकता’ विषयावरील निवडक ५० कलाकृतींचे हे प्रदर्शना खास आयाेजित केले आहे. ब्राईट्सव्दारे सतत विवेकवादी विचार व शास्त्रीय दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जाताे. या प्रदर्शनासाठी ही ब्राईट्सने सप्टेंबरमध्ये, "नास्तिकता" या विषयावर राष्ट्रीस पातळीवरील चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे. यासाठी रौनक ग्रुप चे राजन बांदेलकर व प्रतिथयश स्थापत्य अभियंता तथा चित्रकार जयंत कुलकर्णी यांनी ह्या स्पर्धेसाठी खास अमुल्य योगदान दिले आहे.
देशभरातील जवळ जवळ २५० ते २६० चित्रकारांचा या स्पर्धेत सहभाग हाेता. या चित्रकारांच्या चित्रांतून कलाक्षेत्रातील प्रथितयश परीक्षक, जेष्ठ कलाकार अमोल पालेकर व जेष्ठ चित्रकार केशव कासार यांच्या मार्फत साधारणपणे ५० कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. ह्या ५० निवडक चित्रांचे हे प्रदर्शन तीन दिवस ठाणेकरांसाठी सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विनामूल्या आहे. त्याचा माेठ्यासंख्येने लाभ घेण्याचा आवाहन ब्राईट्स साेसायटीकडून करण्यात आले आहे.