ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:27 PM2017-12-26T15:27:18+5:302017-12-26T15:32:11+5:30
नौपाड्यातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी अखेर १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर पी वन, पी टू अशा पध्दतीने पार्कींग सेवा सुरु करण्यात आली आहे.
ठाणे - नौपाडा परिसरात कुठेही कसेही वाहन लावण्याची परंपरा कायम आहे. याठिकाणी वाहतुक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. परंतु तरी देखील येथील कोंडी फारशी सुटु शकलेली नाही. त्यामुळे आता रस्त्याच्या एका बाजूला ठराविक वेळेपर्यंत आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ठराविक वेळेपर्यंत पार्कींगची मुबा दिली जाण्याचे बदल वाहतुक पोलिसांमार्फत सुरु करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हे बदल करण्यात आले असून वाहतुक पोलिसांना याबाबतच्या हरकती सुचना मागिवल्या आहेत.
नौपाड्यातील वाहतूकीसाठी गोखले मार्ग महत्वाचा मानला जातो. तसेच शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून या मार्गाला ओळखले जाते. या मार्गावर मागील काही वर्षांपासून वाहनांचा भार वाढल्याने या भागातील राम मारुती रोड, मल्हार सिनेमा, शाहु मार्केट गजानन वडापाव रस्ता आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम अशी पार्कींगची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. परंतु, व्यापारी तसेच ठाणे स्थानकातून रोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी येथील पार्कींगमध्ये दिवसभर वाहने उभी करतात. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºया अनेकांना वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ते रस्त्यावर इतरत्र वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुक कोंडीत अधिक भर पडतांना दिसत आहे.
दरम्यान ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतुक विभागाने येथील पार्कींग पी वन व पी टू अशी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार अधिसुचना काढून तसा बदलही सुरु केला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ३ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजुला तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या डाव्या बाजुला वाहने उभी करण्यात येत आहेत.
- या तीनही ठिकाणी कार, जीप, आदींसाठी पार्कींग समांतर असणार असून हलक्या वाहनांसाठीच ही पार्कींगची सुविधा उपलब्ध असेल असेही वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे बदल १५ दिवसासाठी प्रयोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून या संदर्भातील काही सुचना वा हरकती असल्यास त्या वाहतुक पोलिसांना कळविण्यात याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
*नौपाडा येथील गजानन महाराज चौक कडून समर्थ भाडांर दुकान, गोखले रोड दरम्यान राम मारुती रोडवर सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत डाव्याबाजूला आणि दुपारी ३ ते सकाळी ७ पर्यंत रत्याच्या उजव्या बाजूला पार्कींग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहते.
*राम मारुती क्रॉस रोड वरील शाह कलेक्शन दुकान ते नवलाई दुकानापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ तसेच बँक आॅफ बडोदा ते कॉटन किंग दुकानापर्यंत दुपारी ३ ते सकाळी सात यावेळेत पार्कींगची सुविधा
*गोखले रोडकडून सत्यम कलेक्शनकडे येणाऱ्या महात्माफुले रोडवरील वूड लॅन्ड शुज, केंब्रीज दुकान, कुमार प्लॉस्टीक, दुपट्टा घर, विनी कलेक्शन, प्रसाद बंगला, मधू मिलिंद सोसायटी, झवेरी सोसायटी कडीब बाजूस सकाळी ७ ते दुपारी ३ आणि याच मार्गावरील दुसºया बाजूस दुपारी ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पार्कींगची मुबा देण्यात अली आहे.