राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:42 PM2018-10-02T14:42:19+5:302018-10-02T14:45:46+5:30

महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

Thane : NCP protest against BJP government over many issues | राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

Next

ठाणे -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे. मात्र या वर्षातच भाजपा सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फसला जात आहे. या देशात सध्या अराजकता माजली आहे. सदृढ लोकशाहीचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले  होते. मात्र भाजपाचे सरकार या देशात अप्रत्यक्ष हुकूमशाही लादत आहे. महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत  ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले. या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार; एच.ए.एल. कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, सनातन या संस्थेवर बंदी न घालून हिंसेला संधी देणे, देशातील संविधानाचे दहन करणाऱ्यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून गांधींच्या सत्य -अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फसला जात आहे. असे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच ५६ इंचाची छाती असल्याचे सांगून सत्ता मिळवलेल्यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित , आदिवासी, मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहीम राबवली असल्याचा आरोप करून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सरकारचा निषेध  करण्यात आला. 

 

Web Title: Thane : NCP protest against BJP government over many issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.