नादमध्ये बसून आमचा नाद करु नका - प्रदेश प्रवक्ते आनंद पराजपे

By अजित मांडके | Published: February 6, 2024 09:25 PM2024-02-06T21:25:14+5:302024-02-06T21:25:54+5:30

आता नाद मध्ये बसलेल्यांनी आमचा नाद करु नका, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.

thane news, State spokesperson Anand Parajpe warns | नादमध्ये बसून आमचा नाद करु नका - प्रदेश प्रवक्ते आनंद पराजपे

नादमध्ये बसून आमचा नाद करु नका - प्रदेश प्रवक्ते आनंद पराजपे

ठाणे: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ या चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे.आता नाद मध्ये बसलेल्यांनी आमचा नाद करु नका, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे  ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी,  मध्यवर्ती कार्यालयसमोर ढोलताशे वाजवून, फटाके फोडून, झेंडे फडकावित, नाचत गात, एकच वादा, अजितदादा अशा घोषणा देत जल्लोषात आपला आनंद साजरा केला, या देशातील संविधानाचा आता विरोधकांनी सन्मान ठेवत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मनमोकळेपणाने स्वागत करावे, आता नाद मध्ये बसून आमचा नाद करु नका असे परांजपे यांनी सांगितले.

Web Title: thane news, State spokesperson Anand Parajpe warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.