Thane: आपले सरकार सेवेच्या एनआयसी अप्लिकेशन, जीटूजी सेवा देण्यात ठाणे जिप. राज्यात द्वितीय!...

By सुरेश लोखंडे | Published: June 23, 2023 04:16 PM2023-06-23T16:16:46+5:302023-06-23T16:17:03+5:30

Thane: जी २ जी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित करण्यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा  दिल्या आहेत.

Thane: NIC application of your government service, G2G service in Thane zip. Second in the state! | Thane: आपले सरकार सेवेच्या एनआयसी अप्लिकेशन, जीटूजी सेवा देण्यात ठाणे जिप. राज्यात द्वितीय!...

Thane: आपले सरकार सेवेच्या एनआयसी अप्लिकेशन, जीटूजी सेवा देण्यात ठाणे जिप. राज्यात द्वितीय!...

googlenewsNext

-सुरेश लोखंडे 
ठाणे - जी २ जी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित करण्यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा  दिल्या आहेत. त्यामुळे या ठाणे जि.प.ने जी २जी सेवेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या जिल्हा परिषदेने जी २जी सेवेसह प्रिया सॉफ्ट, प्लान प्लस, एम - आक्शन सॉफ्ट यासर्व एन आय सी एप्लिकेशन्स आदींमध्ये देखील राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. ठाणे जिल्हा परिषदने आपले सरकार सेवा केंद्रातून प्रत्येक ग्रामपंचायतीने ९७ टक्के सेवा वितरीत करून ग्रामस्थांना उत्तम सेवा दिली आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदंल याचे मार्गदर्शनासह. ग्राम पंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यात जी २ जी, एन आय सी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवता आला आहे. त्यामुळे या अधिकार्यांसह जिल्हा परिषदेचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. तर ठाणे जिल्हा परिषद जी २ जी, एन आय सी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला हि अभिमानास्पद बाब आहे. यासाठी गटविकास अधिकारी, जिल्हा समन्वयक प्रदिप पाटील व सर्व तालुका समन्वयक यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करुन उत्तम कामगिरी बजावली डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Thane: NIC application of your government service, G2G service in Thane zip. Second in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे