आर्थिक शिस्तीचे ठाणे, चार हजार ३७० कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर, करवाढ टाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 06:42 AM2023-03-22T06:42:29+5:302023-03-22T06:42:37+5:30

कोणत्याही जुन्या प्रकल्पांचा यात समावेश नसून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अंतर्गत शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, खड्डेमुक्त रस्ते, शून्य कचरा मोहीम आदी महत्त्वाच्या मुद्यांचा यात समावेश केला आहे.

Thane of financial discipline, submitted a basic budget of 4 thousand 370 crores, avoided tax hike | आर्थिक शिस्तीचे ठाणे, चार हजार ३७० कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर, करवाढ टाळली

आर्थिक शिस्तीचे ठाणे, चार हजार ३७० कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर, करवाढ टाळली

googlenewsNext

ठाणे : कोणतीही कर व दरवाढ नसणारा, आर्थिक शिस्तीचा सन २०२३-२४ चा चार हजार ३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी मंगळवारी सादर केला. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहर विकासाची छाप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोणत्याही जुन्या प्रकल्पांचा यात समावेश नसून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अंतर्गत शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, खड्डेमुक्त रस्ते, शून्य कचरा मोहीम आदी महत्त्वाच्या मुद्यांचा यात समावेश केला आहे.

 ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ मध्ये तीन हजार ३८४ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र, काही विभागांच्या उत्पन्नात घट येत असल्याने महसुली उत्पन्न तीन हजार ०२१ कोटी ५१ लाखांऐवजी दोन हजार ७८५ कोटी ४५ लाखांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अशा प्रकारे २०२२-२३ मध्ये आरंभीच्या शिल्लक रकमेसह सुधारित अंदाजपत्रक चार हजार २३५ कोटी ८३ लाख व सन २०२३-२४ मध्ये आरंभीच्या शिल्लक रकमेसह मूळ अंदाजपत्रक चार हजार ३७० कोटींचे सादर करण्यात आले.

कोणतीही करवाढ, दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रशासकीय कामात सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करणे, कामांचा दर्जा उत्तम ठेवणे आदी महत्त्वाची उद्दिष्टे या अर्थसंकल्पात आहेत.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाला महत्त्व 

स्वच्छ ठाणे अंतर्गत शून्य कचरा मोहीम राबविणे, हस्तांतरण स्थानक, डायघर प्रकल्प कार्यान्वित करणे, दिवा क्षेपणभूमी बंद करणे, सार्वजनिक रस्ते साफसफाई, स्वच्छ शौचालयांतर्गत शौचालय नूतनीकरण व पुनर्बांधणी, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, कंटेनर शौचालय उभारणी केली जाणार आहेत. 

खड्डेमुक्त ठाणे अंतर्गत मजबूत रस्त्यांचे जाळे, सिमेंट क्राँक्रीट रस्त्यातील अंतर सांधे भरणे, चरांचे पुनपृष्टीकरण, रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी विशेष लक्ष आदी कामे केली जाणार आहेत.

सुंदर ठाणे 
अंतर्गत शहर सौंदर्यीकरणावर भर देणे, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभिकरण, सीएसआर माध्यमातून तलाव संवर्धन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना राबविली जाणार आहेत.

आशा स्वयं सेविकांना अतिरिक्त मानधन, प्रसूतीगृहांचे बळकटीकरण, पोषण आहार, मातृत्व भेट आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

या महत्त्वाच्या गोष्टीही अर्थसंकल्पात

 पार्किंग प्लाझा येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, माझी आरोग्य सखी, महापालिका हद्दीत सीबीएससी शाळा सुरू करणे, कळवा रुग्णालयाचे बळकटीकरण, मराठी शाळांचे सक्षमीकरण, इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरू करणे, अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सक्षम करणे, दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था
  झोपडपट्टी तिथे वाचनालय,  घाटकोपर ते ठाणे दरम्यान इस्टर्न फ्री वे चा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, पार्किंग, क्लस्टर योजना, अंतर्गत मेट्रो, 
  धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना, फेरीवाला धोरण, म्युनिसिपल फंड आदी महत्त्वाच्या बाबींचा अर्थसंकल्पात समावेश आहे.

Web Title: Thane of financial discipline, submitted a basic budget of 4 thousand 370 crores, avoided tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.