बुलेट ट्रेनच्या विद्युत वाहिन्यांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By सुरेश लोखंडे | Published: February 9, 2023 04:41 PM2023-02-09T16:41:48+5:302023-02-09T16:41:57+5:30
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : या तालुक्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात शीळ,पडले,डावले व देसाई येथील येणा-या अति ...
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: या तालुक्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात शीळ,पडले,डावले व देसाई येथील येणा-या अति उच्च दाब विद्युत मनोरे व विद्युत तारांच्या स्थलांतरात शेतकरी मोठ्याप्रमाणात बाधीत होणार आहे. त्यामुळे या संतापलेल्या शेतकरी भूमिपुत्रांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रत्यक्ष भेटू त्यांना समस्या लक्षात आणून देत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
विद्युत मनोरा, वाहिनी बाधीत शेतक-यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी साकडे घातले. या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांच्या उभारणीसाठी मनोºयाने व्याप्त व वाहिनीच्या तारेखालील जमिनीच्या मोबदल्याची या शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे मागणी केली आहे. या शेतक-यांच्या खाजगी शेतजमीनीमधून नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशन लिमिटेड यांचा हा मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प प्रस्तावित आहे. या मार्गासाठी एमएसईटीसीएलच्या व टाटा पॉवर कंपनीच्या विविध ट्रांसमिशन लाईन्सचे स्थलांतर,उंची वाढवण्याच्या कामात बाधीत होत आहेत. याबाधीत भूखंडाचा मोबदला समाधानकारक मिळावा, अशी मागणी या बाधीत शेतक-यांकडून करण्यात आली आहे.
विद्युत मनो-याप्रमाणेच वाहिनीच्या पट्याखाली बाधित होणा-या जमिनीचा मोबदला देण्यात यावा. पारेषण व टाटा पॉवर यांचेकडून बाधित जमिन वगळून उर्वरीत जमिनीत बांधकाम करण्याचा ना हरकत दाखला मोफत देण्यात यावा. विद्युत तारांखालील जमिनीचा मोबदला मनो-याप्रणाने मिळत नसेल तर या तारांखाली जमिनीत बांधकाम करण्यास परवानगी देण्यात द्यावी. संबंधीत गावांची भूसंपादन संयुक्त मोजणी करुन नकाशा व विवरणपत्र तयार करण्यात यावेत. बाधित जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष कामापूर्वी एक रकमी देण्यात यावा आदी मागण्या या बाधीत शेतक-यांकडून करण्यात आल्या आहेत.