Thane: जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून उल्हासनगर महापालिका महिला सफाई कामगारांचा गौरव

By सदानंद नाईक | Published: March 11, 2024 06:45 PM2024-03-11T18:45:01+5:302024-03-11T18:45:56+5:30

Ulhasnagar News: जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महापालिका आरोग्य विभागाने महिला सफाई कामगारांचा रिजेन्सी हॉल येथे सोमवारी गौरव केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मार्गदर्शन केले असून यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आदीजन उपस्थित होते.

Thane: On the occasion of International Women's Day, honoring Ulhasnagar Municipal Women Sweepers | Thane: जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून उल्हासनगर महापालिका महिला सफाई कामगारांचा गौरव

Thane: जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून उल्हासनगर महापालिका महिला सफाई कामगारांचा गौरव

- सदानंद नाईक
उल्हासनगर - जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महापालिका आरोग्य विभागाने महिला सफाई कामगारांचा रिजेन्सी हॉल येथे सोमवारी गौरव केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मार्गदर्शन केले असून यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिकेने महिलांसाठी विशेष महिला उद्यान, सभागृह बांधले असून विविध उपक्रम राबवित आहेत. आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त कॅम्प नं-२ येथील रिजेन्सी हॉल मध्ये सोमवारी महिला सन्मान सोहळा कार्यक्रमाचें आयोजन केले. महापालिकेतील सर्व महिला सफाई कर्मचारी व शिपाई कर्मचारी यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महिलांना बचतीचे महत्व पटवून आर्थिकरित्या सक्षम बनण्याकरता मार्गदर्शन केले.

महापालिकेने आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्याला, उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आदीजन उपस्थित होते. यावेळी केणे यांनी महापालिका कार्यालयीन कामकाज, स्वच्छ भारत अभियान व पतपेढीच्या विविध योजनांची माहिती दिली. मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनी महापालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक सुविधांचा व योजनेचे लाभ घेण्याबाबत माहिती दिली. सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, कोणार्क ग्रीन एन्विरोचे श्री समीर, स्वछता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Thane: On the occasion of International Women's Day, honoring Ulhasnagar Municipal Women Sweepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.