ठाणे पुन्हा एकदा हरवतेय कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:31+5:302021-04-28T04:43:31+5:30

ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे आणि महापालिकेने सुरू केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाययोजनांमुळे आणि त्यातही ठाणेकरांनीही महापालिकेला सहकार्य ...

Thane is once again losing to Corona | ठाणे पुन्हा एकदा हरवतेय कोरोनाला

ठाणे पुन्हा एकदा हरवतेय कोरोनाला

Next

ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे आणि महापालिकेने सुरू केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाययोजनांमुळे आणि त्यातही ठाणेकरांनीही महापालिकेला सहकार्य केल्याने ठाणे शहर पुन्हा एकदा कोरोनाला हरविण्याच्या तयारीत आहे. मागील १० दिवसांत शहरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. एप्रिल महिन्यात ठाण्यात कोरोनाचे नवे ३७ हजार ७५३ रुग्ण आतापर्यंत आढळले असले तरी याच कालावधीत तब्बल ३१ हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब असून शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यांत एक लाख १५ हजार ६२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एक लाख एक हजार ६१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ४४९ एवढी आहे. त्यातही यातील आठ हजार ६१० रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. म्हणजेच ८० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. तर विविध रुग्णालयांत तीन हजार ४५२ रुग्ण उपचार घेत आहेत. १६७ व्हेंटिलेटरवर तर ५१५ रुग्ण हे आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.

फेब्रुवारी अखेरपासून ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत होती. रुग्णांना बेड मिळणे देखील कठीण झाले होते. त्यातही रुग्णांचे मृत्यू देखील वाढताना दिसत आहे. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात १५ लाख दोन हजार १९७ नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. त्यातील एक लाख १५ हजार ६२९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. आजही दिवसाला पाच हजारांच्या आसपास चाचणी केल्या जात आहेत. दुसरीकडे आता मागील काही दिवसात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवडाभरात हा आकडा वाढताना दिसत आहे. १५ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता ८८ टक्क्यांच्या आसपास आले आहे. महापालिका कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाय करीत आहे. एकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३९ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यातही लॉकडाऊनमुळे देखील आता रुग्ण दरवाढीची संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसात रुग्ण दरवाढीचा वेग कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी शहरात ६९८ नवे रुग्ण आढळले असून एक हजार ३४९ रुग्णांनी एका दिवसात कोरोनावर मात केली आहे. एप्रिल महिन्यात शहरात ३७ हजार ७५३ नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत १७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून याच कालावधीत तब्बल ३१ हजार २३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जानेवारी महिन्यापासून ठाण्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या तर शहरातील ५६ केंद्रे सुरू असतात. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख ७९ हजार १६० जणांचे यशस्वी लसीकरण केले आहे.

एप्रिल - नवे रुग्ण - मृत्यू -बरे झालेले रुग्ण

२६ - ६९८ - ८ - १३५०

२५ - १०५४ - १० - १४९५

२४ - ११०८ - ८ -१६७५

२३ - ११३७ - ७ - १५२७

२२ - १४५८ - ११ - १३८१

२१ - १२६६ - १० - १७०२

२० - १२९४ -८ - १४५६

१९ - १२९० - ७ - १८२०

१८ - १५९३ - ५ - १८२४

१७ - १४७५ - ५ - १६१०

१६ - १४१० - ९ - १२५४

१५ - १५०५ - ८ -१७४७

१४ - १६७७ - ६ - १५१९

१३ - १५३३ - ८ - ११०२

१२ - १४१४ - ६ - १०६४

११ - १७११ - ७ - १०७३

१० - १४६४ - ५ - ११०४

९ - १८२५ - ६ - १०६५

८ - १८२९ - ७ - १२१७

७ - १६१९ - ५ -११११

६ - १८८३ - ४ - १२१३

५ - १५८० - ५ - १०६१

४ - १७०१ - ५ - १०४६

३ - १४२७ - ५ - ७९०

२ - १३७० - ३ - ७७१

१ - १४३२ - ५ - ५७९

-----------------

३७,७५३ - १७३ - ३१,२३२

Web Title: Thane is once again losing to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.