Thane: आदेश आला आणि टीएमटी झाली बंद, परिवहनला बसला १५ लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 04:03 PM2022-12-17T16:03:21+5:302022-12-17T16:03:50+5:30

Thane News: उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही.

Thane: Order came and TMT closed, transport hit by 15 lakhs | Thane: आदेश आला आणि टीएमटी झाली बंद, परिवहनला बसला १५ लाखांचा फटका

Thane: आदेश आला आणि टीएमटी झाली बंद, परिवहनला बसला १५ लाखांचा फटका

Next

- अजित मांडके

ठाणे  - उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे सॅटीसवर बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले. परंतु प्रवशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन सेवा बंद ठेवणो अपेक्षित नव्हते. मात्र आम्ही काय करणार आदेश आल्याने आम्ही त्याचे पालन केल्याचे परिवहनच्या एका वरीष्ठ अधिका:याने सांगितले. परंतु या आदेशामुळे परिवहनची एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल तर झालेच शिवाय परिवहनला सुमारे १५ लाखांचे तोटा सहन करावा लागला.

ठाणे  शहराच्या लोकसंख्येनुसार शहराला ६०० बसची आवश्यकता आहे. परंतु सध्याच्या घडीला केवळ ३२४ च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. त्यातून परिवहनला २५ ते २७ लाखांचे उत्पन्न रोजच्या रोज मिळत आहे. त्यात कोरोनामध्ये परिवहनचे पुर्ते कंबरडे मोडल्याचे दिसून आले. शेकडो बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. अशात कोरोनानंतर परिवहन सेवा आता कुठे सावरतांना दिसत आहे. परंतु असे असतांना शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये परिवहन सेवेने देखील आपली सेवा बंद ठेवल्याचे दिसून आले.

परिवहनच्या ३२४ बसपैकी एकही बस शनिवारी रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रत लोकलने ठाणो गाठून कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सॅटीसवर उभ्या असलेल्या हाजारो प्रवाशांना बसची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागले. त्यात खालील बाजूस असलेल्या रिक्षा देखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांना पायी जाण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून आले. एकीकडे एसटी, बेस्ट, नवीमुंबई महापालिका व इतर प्राधिकरणाच्या बस ठाण्यात येत होत्या. परंतु ठाण्याचीच परिवहन सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.

परिवहन सेवा ही सार्वजनिक वाहतुक सेवा असल्याने ती चालू ठेवणो गरजेचे होते. परंतु तरी देखील ती कोणाच्या सांगण्यावरुन बंद ठेवण्यात आली असा सवाल प्रवाशांनी केला. याच संदर्भात परिवहनच्या एका वरीष्ठ अधिका:याला छेडले असता, आम्हाला आदेश आले आणि आदेशाचे पालन आम्ही केले असल्याचे त्याने सांगितले. परंतु यामुळे परिवहनला सुमारे १५ लाखांचा तोटा सहन करावा लागल्याचेही दिसून आले आहे. आधीच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात शनिवारी पुन्हा बंदमुळे परिवहनला तोटा सहन करावा लागल्याचे दिसून आले.

Web Title: Thane: Order came and TMT closed, transport hit by 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.