साडे चार कोटींच्या कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्याच्या १२६९ शेतकऱ्यांची नव्याने निवड
By सुरेश लोखंडे | Published: October 4, 2018 04:56 PM2018-10-04T16:56:53+5:302018-10-04T17:04:01+5:30
आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली.
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी ठाणे जिल्ह्यातील ६८५ तर पालघर जिल्ह्यातील ५८४ आदी एक हजार २६९ शेतकऱ्यांची राज्य शासनाने नव्याने निवड केली. तशी यादी नुकतीच २८ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसीसी) सुपूर्दही केली. या यादीतील शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजार रूपयांचे कर्जमाफीचे नियोजन केले आहे.
आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३६ हजार ७३२ शेतकऱ्यांना १२७ कोटी ७६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा दावा टीडीसीसी बँकेकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार १८५ शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख ७२ हजार रूपयांचे कर्जमाफ झाले तर पालघर जिल्ह्यातील १७ हजार ५४७ शेतकऱ्यांना ६४ कोटी ११ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेव्दारे कर्जमाफी मिळाली आहे. याप्रमाणेच नव्याने या दोन्ही जिल्ह्यातील एक हजार २६९ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांचे सुमारे चार कोटी ४८ लाख ९१ हजारांचे कर्जमाफ होईल. यासाठी या यादीतील शेतकऱ्यांची तालुका पातळीवरील कमिटीकडून (टीएलसी) लवकरच तपासणी होऊन या एक हजार २६९ शेतकऱ्यांमधील पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. योग्य ते तपासणी होऊन संबंधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची आता दहावी ग्रीनलिस्ट यांदी जाहीर करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांची तालुका स्तरावरील असिस्टन रजिस्टार, लेखा परीक्षक आणि टीडीसीसी बँकेचे वसुली अधिकारी यांच्या कमिटीव्दारे तपासणी होईल. त्यातून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. या नव्याने प्रसिध्द झालेल्या दहाव्या ग्रीनलिस्ट यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील ३९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांतील पात्र चा सुमारे एक कोटी सहा लाखांचे कर्ज माफ होईल. या खालोखाल शहापूर तालुक्यातील १५० शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी नव्याने निवड झाली. यातील पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५० लाख ९२ हजार रूपये कर्जमाफी देण्याचे नियोजन आहे.
या ग्रीनलिस्ट यादीमध्ये भिवंडी तालुक्यातील देखील ८० शेतकऱ्यांची नावे आहेत. या निवड झालेल्या भिवंडीच्या शेतकऱ्यांना २७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्ज माफीची नियोजन आहे. याखालोखाल अंबरनाथ तालुक्यामधील ४० शेतकऱ्यांची निवड झाली. यामध्ये कुळगांवच्या ३७ शेतकऱ्यांसह नेवाळीच्या तीन शेतकऱ्यांची या कर्जमाफीसाठी निवड झाली. त्यांना सुमारे १३ लाख ९२ हजारांचे कर्म माफ होईल. कल्याण तालुक्यातील गोवेळी येथील चार शेतकऱ्यांनासह कल्याणच्या पाच आणि मांडा टिटवाळा येथील ११ शेतकऱ्यांची या दहाव्या ग्रीन यादीत निवड झाली. या २० शेतकºयांना १४ लाख ६८ हजारांचे कर्जमाफी मिळणार आहे.