ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:39 AM2018-04-24T01:39:30+5:302018-04-24T01:39:30+5:30

आरटीओची आकडेवारी : दुचाकीं अडीच लाख, रिक्षाही प्रचंड

Thane-Palghar falls in the footsteps of lakhs of vehicles | ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

Next

पंकज रोडेकर ।
ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत २०१७-१८ या वर्षभरात सुमारे पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सुमारे अडीच लाख दुचाकींचा समावेश आहे. येथे रिक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास ठाणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ८० हजार वाहनांचा समावेश असून उर्वरीत ८५ हजार वाहने ही पालघर जिल्ह्यातील आहेत.
ठाणे आरटीओ विभागांतर्गत असलेले ठाणे, कल्याण, नवी मुंबई हे तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात तर वसई हा उपविभाग पालघर जिल्ह्यात येतो. या उपविभागात सर्वच प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानुसार, मागील तीन वर्षांत दोन्ही जिल्ह्यांत दहा लाखांहून अधिक वाहने नोंदवली गेली आहेत.
२०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये २५ हजार वाढली होती. ती २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात ३५ हजार वाहनांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने वाहतूककोंडी आणि वायू प्रदूषणातही भर पडते.

वर्षभरात ३९ हजारांनी रिक्षा वाढल्या
२०१७-१८ या वर्षभरात रिक्षा परमिट वाटपामुळे तब्बल ३८ हजार ५९६ रिक्षांची भर पडली आहे. यामध्ये ठाणे १४ हजार ७९५ त्याचपाठोपाठ कल्याण १३ हजार ३४७, वसई ५७५९ आणि नवी मुंबई ४६९५ इतक्या रिक्षांची नोंदणी झाली आहे.

७रस्त्यावर अडीच लाख दुचाकींची भर
आरटीओत २०१७-१८ या वर्षात २ लाख ४४ हजार ६५२ दुचाकी वाहनांची नोंदणी केली गेली आहे.

Web Title: Thane-Palghar falls in the footsteps of lakhs of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास