ठाणे, पालघरचे रस्ते होणार चकचकीत
By Admin | Published: November 19, 2015 12:12 AM2015-11-19T00:12:15+5:302015-11-19T00:12:15+5:30
ठाणे आणि पालघरमधील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्तेबांधणीसाठी नगरविकास विभागाने ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांची भरीव मदत केली आहे. दोन टप्प्यांत
- नारायण जाधव, ठाणे
ठाणे आणि पालघरमधील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्तेबांधणीसाठी नगरविकास विभागाने ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांची भरीव मदत केली आहे. दोन टप्प्यांत हे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित नगरपंचायतींसह नगरपालिका आणि महापालिकांना दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे शासनाची काही थकबाकी तर नाही ना, असेल तर ती कापून हे अनुदान वितरीत करावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित नगरपालिका आणि महापालिकेने रस्तेबांधणीसाठीच ते वापरावयाचे असून ई-निविदेद्वारे विकास आराखड्यात प्रस्तावित रस्त्यांच्या बांधकामांसाठीच ती वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना नगरविकास विभागाने २४५ कोटी सहा लाख ३० हजार रुपये मंगळवारी वितरीत केले आहेत. त्यातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला हे ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
कुणाला किती निधी मिळाला?
शहापूर नगरपंचायत०४ लाख ४२ हजार ७७४
जव्हार नगरपरिषद०४ लाख ५८ हजार ६६०
मुरबाड नगरपंचायत०८ लाख तीन हजार ३५
डहाणू नगरपरिषद१९ लाख १५ हजार ६६६
पालघर नगरपरिषद२६ लाख २५ हजार ८६५
मीरा-भार्इंदर महापालिका३४ लाख ३३ हजार ८६४
नवी मुंबई महापालिका४७ लाख ५४ हजार २९
वसई-विरार महापालिका५१ लाख ८६ हजार १०८
कल्याण-डोंबिवली महापालिका५२ लाख ९१ हजार ९०६
कुळगाव-बदलापूर६६ लाख ३७ हजार ८०
ठाणे महापालिका७८ लाख १२ हजार ६९१
अंबरनाथ९६ लाख ५६ हजार ४४ रुपये
भिवंडी महापालिकातीन कोटी ३० लाख १० हजार ८२२
उल्हासनगर महापालिकातीन कोटी २१ लाख ४७ हजार १७०