जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

By admin | Published: August 24, 2015 11:28 PM2015-08-24T23:28:56+5:302015-08-24T23:28:56+5:30

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७०

Thane-Palghar's 37 thousand objections on the survey of caste! | जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

Next

ठाणे : ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७० नागरिक, ग्रामस्थ व आदिवासी कुटुंबांनी हरकती घेतल्या असता त्यापैकी बहुतांशी निकाली काढण्यात आल्या आहेत.
जात सर्वेक्षणाविरोधात नागरिकांनी विविध स्वरूपांच्या तक्रारी केल्या आहेत. यामुळे प्रसिद्ध झालेल्या जात सर्वेक्षण अहवालावरील आकडेवारीवर आक्षेप घेण्यासह त्यातील चुकांची दुरुस्ती, गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित झालेले, ग्रामसभांचे आक्षेप अशा विविध स्वरूपांचा हरकतींमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या दणक्याने संबंधित एजन्सीने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला, पण त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यामुळे नागरिकांनी त्याविरोधात हरकती घेतल्या आहे.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार हजार ५९८ हरकतींपैकी चार हजार ३३५ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २६३ हरकती शिल्लक राहिल्या आहेत. याशिवाय, नावात बदल असलेले ३६० तर १२३ स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या.
याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ३२ हजार ६७२ नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. उर्वरित
२५ हजार ११४ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. शिल्लक सात हजार ५५८ हरकती आहेत. यातील आक्षेप घेतलेल्यांमध्ये १४०८ नावांत बदल करणाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
उर्वरित स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमध्ये ५३ जणांनी जात सर्वेक्षणावर आक्षेप घेऊन त्यातील दुरुस्तीची मागणी केली आहे. यानुसार, दोन्ही जिल्ह्यांत
प्राप्त झालेल्या जात सर्वेक्षणावरील आक्षेपांची कसून चौकशी
करून त्यातील बहुतांशी निकाली काढण्याचे प्रयत्न करून त्यांच्या आॅनलाइप डेटा एण्ट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Web Title: Thane-Palghar's 37 thousand objections on the survey of caste!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.