पं. राम मराठे महोत्सव : पल्लवी नाईक यांनी सादर केले मराठी रचनांवर आधारित भरतनाट्यम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 12:33 PM2017-11-04T12:33:45+5:302017-11-04T12:39:19+5:30
गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पंडित राम मराठे महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पाचे पहिले सत्र नृत्यांगना पल्लवी नाईक यांनी गुंफले.
ठाणे - गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पंडित राम मराठे महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पाचे पहिले सत्र नृत्यांगना पल्लवी नाईक यांनी गुंफले. यावेळी त्यांनी विविध अद्वैताची अनुभूती देणारे भरतनाट्यम नृत्य शैलीतील मराठी रचनांवर आधारित सादरीकरण केले.
नृत्य शैलीनंतर शास्त्रीय गायन आयोजित केले आहे. यात शास्त्रीय गायिका दीपिका भिडे- भागवत व वरदा गोडबोले यांचे सादरीकरण आहे. भिडे यांनी जौनपूरी रागाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे शेवटचे पुष्प शनिवारी गुंफले जात आहे.
दुसऱ्या सत्रात द गोवा हिंदु असोसिएशन, कला विभाग प्रस्तुत मत्स्यगंधा या संगीत नाटकाचा प्रयोग दुपारी 4 वाजता होणार आहे. या समारंभाचा समारोप व पं.राम मराठे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी 7.30 वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.