माणुसकीला सलाम! कोरोनामुळे निराधार झालेल्या कमलाबाईना संवेदनशील ठाणेकरांनी दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:53 PM2021-05-20T15:53:27+5:302021-05-20T15:54:28+5:30

कमलाबाई दळवी या ५८ वर्षीय महिलेला हॅप्पी व्हॅलीच्या शेजारील सहयोग बस स्टॉपच्या जवळ बसलेल्या भाग्यश्री अविनाश देशमुख यांना दिसल्या. पुन्हा दोन तीन दिवसांनी आजी तिथे दिसल्या म्हणून भाग्यश्री यांनी त्यांना विचारपूस केली तेव्हा कळलं की, मागील पाच ते सहा महिन्यापासून त्या तिथे राहतात. त्यांना कोणीही नाही.

Thane people give support to Kamalabai who became destitute due to corona | माणुसकीला सलाम! कोरोनामुळे निराधार झालेल्या कमलाबाईना संवेदनशील ठाणेकरांनी दिला आधार

माणुसकीला सलाम! कोरोनामुळे निराधार झालेल्या कमलाबाईना संवेदनशील ठाणेकरांनी दिला आधार

Next

ठाणे : कमलाबाई दळवी या ५८ वर्षीय महिलेला हॅप्पी व्हॅलीच्या शेजारील सहयोग बस स्टॉपच्या जवळ बसलेल्या भाग्यश्री अविनाश देशमुख यांना दिसल्या. पुन्हा दोन तीन दिवसांनी आजी तिथे दिसल्या म्हणून भाग्यश्री यांनी त्यांना विचारपूस केली तेव्हा कळलं की, मागील पाच ते सहा महिण्यापासून त्या तिथे राहतात. त्यांना कोणीही नाही. मुलबाळ नाही, नवरा आस्थामा ह्या आजाराने पंधरा वर्षा पूर्वीच वारले. कमलाबाई ह्या घरकाम करून स्वतःच  उदरनिर्वाह करीत होती. मानपाडा, शिवाजीनगर येथे त्या भाड्यानं रहात असायच्या. पण कोरोनाने हातातील सर्व कामे गेली. त्यामुळे तिथून भवानी नगरला राहायला आल्या. हजार रूपये महिना घरभाडं देत मागच्या पावसात घरात पाणी घुसून सगळे कागदपत्र भिजले व भाडं दयायला पैसे ही नाही म्हणून घरमलकाने घराबाहेर काढलं. जवळच्या असलेल्या या बस स्टॉपवरच कमलाबाईंनी संसार थाटला. सगळं चांगलं होत पण रात्री माध्यपान करणारे व दिवशी उन्हाच्या तडक्यामुळे त्याना त्रास होत होता. कोणी काही दिले तर खायचं, नाहीतर दिवसभर चहा पिऊन जगायचं पण भीक मागायची नाही. पैसे कोणाला मागायचेच नाही. असे कमलाबाई यांनी मनोमन ठरवले होते.

अचानक तौक्ती चक्रीवादळाची बातमी ऐकायला आली आणि भाग्यश्रीनी त्यांना छत्री घेऊन दिली व गप्पा मारायला गेले. पण पाऊस खूप जोरात असल्याने त्यांना झोपताही आलं नाही. तेव्हा प्लास्टिक ताडपत्री बसस्टॉप ला बांधली पण फायदा काही झालं नाही. कारण हवा, पाऊस जोरात मग कळेना काय करायचं ?  

भाग्यश्रीने त्यांना साड्या, ब्लाउज, वगैरे घेतले खायला, खाऊ, बॅग, रोजच्या लागणारे साहित्य घेतले. व  आरती भोर ह्यांनी मोफत ब्लाऊज वेळेत शिवून दिले. व अमोल जाधव ह्यांनी त्याच्या साठी जेवणाची सोय केली. व त्याना कोणता आजार किंवा काही आहे का ह्यासाठी डॉक्टर कडे ही नेण्यात आले. परंतु कायमस्वरूपी मार्ग निघावं म्हणून कोणीतरी मदत करावी या साठी भाग्यश्रीने फेसबुकचा वापर केला. फेसबुकची पोस्ट वाचून समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले यानी भाग्यश्रीला संपर्क करून काही तरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन अजयनी सायली साळवी यांच्यासह त्या कमलाबाईंची भेट घेतली आणि त्याची खरी माहिती काय  आहे ? नेमकं काय घडलं  ? व त्याना कोणी नातेवाईक , मुलं , असे कोणी आहे का ?  ही माहिती घेतली. स्वतः भाग्यश्री ह्यांनी ही माहितीचा शोध घेतला. आश्रमात ठेवायचं तर खर्च आर्थिक बळ लागणार होतं. म्हणून अजयनी धर्मवीर आंनद दिघे विचार मंच व सेवा मधील संस्थापक जयदीप कोर्डे ह्यांना संपर्क करून ठाणे महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात त्यांची सोय केली. परंतु कमलाबाईची मानसिक तयारी काही होत न्हवती. सर्वांनी मिळून त्याना समजावून मानसिक आधार दिला. व  त्यांना विश्वासात घेऊन शेवटी ठाणे महापालिकेच्या निवारा केंद्रात त्यांना दाखल केले. भाग्यश्री देशमुखच्या संवेदनशील स्वभाव आणि समता विचार प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते सायली साळवी, अजय भोसले, दर्शन पडवळ, इनोक कोलीयर, रवी इसाक, ओम गायकवाड शुभम कोळी व धर्मवीर आनंद दिघे विचार मंच व सेवा संस्थेच्या संस्थापक जयदीप कोर्डे आदी ठाणेकरांनी विशेष श्रम घेतले.

Web Title: Thane people give support to Kamalabai who became destitute due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.