ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबलने घातली बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:43 PM2017-09-04T16:43:01+5:302017-09-04T16:43:28+5:30

ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संकेंनी धुडगूस घातला. कॅश काऊंटवर बसणाऱ्याला आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली.

Thane police constable stabbed in the bar, beat managers | ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबलने घातली बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण 

ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबलने घातली बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण 

Next

ठाणे, दि. 09 - ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संकेंनी धुडगूस घातला. कॅश काऊंटवर बसणाऱ्याला आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली.
चार ते पाच दिवसांपूर्वीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेल चालकाने पोलीस आयुक्तालय, उपायुक्त, एसीपी, कळवा पोलिस ठाणे आणि हॉटेल असोसिएशनकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती हॉटेल चालक उमेश करकेरा यांनी दिली.
दारु आणि जेवणाचे एकूण 2 हजार 200 रुपये बिल झाले होते. वाढीव बिलावर डिस्काऊंट देण्यावरुन वाद झाला. तसेच आणखी एका कॉन्स्टेबलला प्रवीण संके मारताना दिसत आहे. तसेच, बारच्याबाहेर पडताना देखील याची अरेरावी करताना सीसीटीव्हीत दिसतात.

Web Title: Thane police constable stabbed in the bar, beat managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा