मालेगाववरून कल्याण स्टेशनवर आलेल्या मुलास ठाणे पोलिसांनी सुखरूप सोडले घरी
By अजित मांडके | Published: October 1, 2022 03:24 PM2022-10-01T15:24:03+5:302022-10-01T15:24:56+5:30
Thane News: ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली.
- अजित मांडके
ठाणे : ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली. रेल्वे पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले होते. मात्र त्याच्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यास त्यांच्या स्वाधीन करण्यात चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.
मालेगाव, नवापुरा वार्ड परिसरात राहणारा रिहान उर्फ रेहान अब्दुल करीम शेख हा १० वर्षीय मुलगा मालेगाव येथून हरवला होता. तो थेट कल्याण येथे पोहचला होता. कल्याण रेल्वे स्थानकावर हा मुलगा रेल्वे पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले. त्याच दरम्यान ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकास या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी संस्थेत जाऊन या मुलाची भेट घेऊन त्याच्या पालकांबाबत माहिती विचारली असता तो मालेगाव येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये संपर्क साधून हा मुलगा मिसिंग असल्याची तक्र ार दाखल आहे का याची पडताळणी केली. मात्र कुठेही मिसिंगची तक्रार नसल्याचे दिसून आले.
दरम्यान पोलिसात मिसिंग तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाणो चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मिसिंग मुलांच्या माहितीसाठी चालवण्यात येणा:या व्हाट्सएप ग्रुपवर या मुलाची माहिती प्रसारित केली. एका ग्रुप मध्ये हा मुलगा मालेगाव येथून हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क केला. मुलाच्या पालकांनी ठाण्यात येऊन या मुलाची नुकतीच भेट घेतली.