विविध गुन्ह्यातून हस्तगत केलेला ४९ लाखांचा मुद्देमाल ठाणे पोलिसांनी केला फिर्यादींना हस्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:57 PM2021-01-07T22:57:15+5:302021-01-07T23:19:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या वर्षभरामध्ये विविध गुन्हयांमधील सोने, रोकड आणि वाहन चोरीतील ४९ लाख २१ हजारांची मालमत्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या वर्षभरामध्ये विविध गुन्हयांमधील सोने, रोकड आणि वाहन चोरीतील ४९ लाख २१ हजारांची मालमत्ता अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना गुरुवारी सुपूर्द केली. यावेळी ४९ गुन्ह्यांमधील तब्बल ५१ तक्रारदारांना आपली मालमत्ता सुखरुप परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
ठाणे शहर पोलिसांतर्फे २ ते ८ जानेवारी दरम्यान रेझिंग डे साजरा केला जात आहे. यानिमित्त ठाण्यातील खारकर आळी येथील एनकेटी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात हा मालमत्ता अभिहस्तांतरणाचा कार्यक्र म पार पडला. यावेळी विविध गुन्ह्यातून हस्तगत केलेली ४९ लाख २१ हजार ४०० रु पयांची मालमत्ता पोलिसांनी फिर्यादींना परत केली. यावेळी ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी, सुनील घोसाळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीसांकडून मिळालेल्या सहकार्याचे तसेच त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वच फिर्यादींनी कौतुक करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. चोरी, जबरी चोरी झालेले दागिने आणि मालमत्ता पोलीसांनी त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहचविण्याच्या या प्रातिनिधिक कार्यक्रमात ५१ तक्रारदारांनी आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. यामध्ये एटीएम मधील रोकडसह महिलाच्या गळयातील सौभाग्याचे लेणे असलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राचा समावेश होता. जोपर्यत तक्र ारदार समोर येत नाही तोपर्यत संबंधित फिर्यादींना हा मुद्देमाल परत देता येत नाही. शिवाय, तक्र ारदारालाही अनेकदा न्यायालयीन प्रक्रि या पार पाडावी लागत असते. त्यावर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांनी खास तक्र ारदारांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये ५० तोळे सोने, १८ दुचाकी, एक मोटारकार, एक सायकल, आठ मोबाईल फोन आणि ७५ हजारांच्या रोकडचा समावेश होता.