ठाणे पोलिसांनी ८ कोटींच्या २ हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त, दोघे अटकेत

By अजित मांडके | Published: November 12, 2022 03:10 PM2022-11-12T15:10:54+5:302022-11-12T15:11:00+5:30

कासारवडली पोलीस ठाण्याच्या पथकाने गायमुख चौपाटी, घोडबंदर रोड भागात सापळा रचला होता.

Thane police seized 2000 fake notes worth 8 crores, two arrested | ठाणे पोलिसांनी ८ कोटींच्या २ हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त, दोघे अटकेत

ठाणे पोलिसांनी ८ कोटींच्या २ हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त, दोघे अटकेत

Next

ठाणे - कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट - ५ ला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गायमुख भागात सापळा रचून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजार रुपयांच्या ८ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तर त्यांनी ज्यांच्याकडून या नोटा घेतल्या होत्या. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणी कासारवडली पोलिसांनी राम हरी शर्मा (५२) रा. विरार, डी मार्ट जवळ, पालघर व राजेंद्र राऊत (५८) रा. कुरगाव, पालघर यांना अटक केली आहे. तर या प्रकरणी या दोघांनी मदन चौहान यांच्याकडून या नोटा आणल्याचे तपासात उघड झाले आहे. या तीघांनी आपसात संगणमत करुन २ हजार रुपयांच्या ४०० बंडल घेऊन ज्याची किंमत ८ कोटी एवढी आहे. या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी ते ठाण्यात येणार असल्याची माहिती कासारवडली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरिक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

कासारवडली पोलीस ठाण्याच्या पथकाने गायमुख चौपाटी, घोडबंदर रोड भागात सापळा रचला होता. त्यानुसार इनोव्हा गाडीतून दोघे जण त्या ठिकाणी आले असता, मोठय़ा शिताफीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे २ हजार रुपयाच्या नोटा आढळून आल्या. त्यानंतर या नोटा तपासल्या असता, त्या बनावट असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार त्यांच्याकडून २ हजाराच्या नोटांचे ४०० बंडल ताब्यात घेण्यात आले. ज्याची किमंत ८ कोटी एवढी असल्याचे दिसून आले.

त्यांच्याकडे या प्रकरणी अधिक तपास केला असता, त्या दोघांनी मदन चौहाण रा. पालघर व इतर साथीदारांच्या मदतीने त्यांचे पालघर येथील कंपनीच्या कार्यालयात छापले असल्याचे सांगितले. तसेच या नोटा विक्रीसाठी घेऊन आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ हजार रुपयांचे ४०० बंडलचे ८ कोटी, मोबाइल, इनोव्हा कार असा ८ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Thane police seized 2000 fake notes worth 8 crores, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे