ठाणे पोलिसांनी उतरवली २,१४३ तळीरामांची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 09:10 PM2020-01-01T21:10:03+5:302020-01-01T21:15:39+5:30

‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली.

Thane police took action against 2,143 drunker driver | ठाणे पोलिसांनी उतरवली २,१४३ तळीरामांची झिंग

१८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी केली कारवाई

Next
ठळक मुद्दे८० अधिकाऱ्यांचा सहभाग२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी चालकांवर खटले१८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवरठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षी मात्र केवळ एका दिवसांत दोन हजार ७१ तळीरामांवर कारवाई झाली होती.
थर्टी फर्स्ट साजरी करण्याच्या धुंदीत अनेक तळीराम हे बेदरकारपणे वाहन चालवितात. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भन्नाट वेगाने जाणाºया वाहनांच्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. तर, अनेकांना गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्वही येते. सर्वाेच्च न्यायालयानेही किमान १० टक्के रस्ते अपघात कमी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी २९ ते ३१ डिसेंबर २०१९ तसेच १ जानेवारी २०२० च्या पहाटेपर्यंत राबविलेल्या विशेष मोहिमेत १८ युनिटमार्फत मोक्याच्या नाक्यांवर ही कारवाई केली.
* ५४ श्वासविश्लेषक यंत्रांचा वापर
२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार खटले भरण्यात आले. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण या विभागात वाहतूक उपशाखेने ही मोहीम राबविली. यासाठी ५४ श्वासविश्लेषक (ब्रिथ अ‍ॅनालायझर) यंत्रांचाही वापर केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
*येथे होती नाकाबंदी
पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या अधिपत्याखाली चार उपविभागांतील सुमारे ८० अधिकाºयांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. ठाण्यातील नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, कासारवडवली, कापूरबावडी, राबोडी आणि वागळे इस्टेट या युनिटच्या तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, आनंद नगरनाका, कोपरी, माजिवडा जंक्शन, गोल्डन डाइजनाका आदी ठिकाणीही तपासणी झाली. तर, कल्याण उपविभागातील कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी या युनिटमधील महामार्ग, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, दूधनाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागांत अनेक वाहनाचालकांना पकडण्यात आले. तसेच भिवंडीतील वंजारपट्टीनाका, धामणकरनाका आणि शिवाजी चौक या भिवंडी, नारपोली आणि कोनगाव युनिटच्या कारवाईतही पोलिसांनी अनेकांची झिंग उतरविली. उल्हासनगरासह विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांत नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांना पकडले.
*मद्यपींची पोलिसांशी हुज्जत
चारही विभागांतील ९० मुख्य नाक्यांवर ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ ते १ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांनी किती प्रमाणात अल्कोहोल घेतले, याची चाचपणी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांशी मद्यधुंद वाहनचालकांनी हुज्जत घालून कारवाईत अडथळे आणण्याचेही प्रकार केले.

Web Title: Thane police took action against 2,143 drunker driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.