ठाणे तलावांची महती सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:43 PM2018-08-21T23:43:18+5:302018-08-21T23:43:57+5:30

जपानमध्ये तलाव परिषद; जलवैज्ञानिक साळसकरांचा सहभाग

The Thane Pond's Mahata Satasamprayapar | ठाणे तलावांची महती सातासमुद्रापार

ठाणे तलावांची महती सातासमुद्रापार

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहराची ओळख ही तलावांचे शहर म्हणून आहे. आता या तलावांची संख्या कमी झाली असली, तरी पालिकेच्या माध्यमातून या तलावांचे संवर्धन करण्याचे काम सुरूआहे. जगाच्या पटलावर थोड्याच शहरांवर निसर्गाची कृपा राहिलेली असताना, ठाण्यातील तलावांची महती सातासमुद्रापार जाणार आहे.
ठाण्यात राहणारे तलावांचे अभ्यासक, जलतज्ज्ञ डॉ. प्रमोद साळसकर यांना जपान येथे होणाऱ्या सतराव्या जागतिक तलाव परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलावण्यात आले आहे. देशभरातून एकूण आठ जण या परिषदेला जाणार आहेत. त्यामध्ये ठाण्यात राहणाºया साळसकर यांना हा मान मिळाला आहे.
जलसंवर्धनाबाबत आता जगभरात प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांत जलजागृतीबाबत सजगता दाखवली जात आहे. तलाव, नदी इतकेच काय, समुद्राचे पाणीदेखील पिण्याजोगे करता येईल, यासाठी जलवैज्ञानिक काम करत आहेत. त्यापैकी एक ठाण्यातील डॉ. प्रमोद साळसकर हे जलतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा पाण्याच्या गुणवत्तेबाबत गाढ अभ्यास आहे. ठाणे आणि मुंबईमधील तलावांच्या संवर्धनासाठी सतत शासकीय आणि जागतिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या कामाची दखल घेऊन जपानने त्यांना आॅक्टोबर २०१८ मध्ये होणाºया सतराव्या जागतिक तलाव परिषदेला हजर राहून भूमिका मांडण्याची विनंती केली आहे. १३ ते १९ आॅक्टोबर यादरम्यान जपानमधील सुकूबा येथील इबाराकी या ठिकाणी ही परिषद होणार असून त्या परिषदेला अमेरिका, जर्मनी, चीन, फ्रान्स, इंग्लंड, कोरिया अशा विविध देशांचे जलवैज्ञानिक हजर राहणार आहेत. जपानच्या माध्यमातून दर दोन वर्षांनी जगभरात विविध ठिकाणी ही परिषद होते.

Web Title: The Thane Pond's Mahata Satasamprayapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.