Thane: मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ कांदळवन क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

By अनिकेत घमंडी | Published: November 17, 2023 07:16 PM2023-11-17T19:16:34+5:302023-11-17T19:17:34+5:30

Thane: ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्यांचा काही भाग हा ठाणे व कल्याण या तालुक्यातून खाडी क्षेत्रातून जातो.

Thane: Prohibitory order till January 18 in Kandalvan area near railway track between Mumbra and Kalyan | Thane: मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ कांदळवन क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

Thane: मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ कांदळवन क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्यांचा काही भाग हा ठाणे व कल्याण या तालुक्यातून खाडी क्षेत्रातून जातो. या मार्गालगत होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाबाबत संबंधीत क्षेत्रामध्ये लोहमार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही रेल्वे पुलाच्या व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने 600 मीटर्स (2 हजार फूट) अंतराच्या आत वाळू/रेती उत्खनन होणार नाही, त्याकरीता दि.20 नोव्हेंबर रोजी रात्री 12.01 पासून ते 18 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी रेल्वे ट्रॅकजवळ व कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या अवैध वाळू/रेती उत्खननाबाबत याचिकाकर्ते श्री. गणेश निळकंठ पाटील यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केली आहे. न्यायालयाने याविषयी गंभीर दखल घेतली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी जिल्हाधिकारी, ठाणे. येथे 29 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील महसूल, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस यंत्रणा व रेल्वे विभागांशी विचारविनिमय करुन अवैध रेती उत्खनन व लोहमार्गास होत असलेल्या संभाव्य धोका लक्षात घेता अभियांत्रिक स्वरुपाच्या उपाययोजनेंतर्गत लोहमार्गालगत गॅबियन बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून अन्यही बंधारे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.

Web Title: Thane: Prohibitory order till January 18 in Kandalvan area near railway track between Mumbra and Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.