सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

By धीरज परब | Published: October 1, 2024 09:58 PM2024-10-01T21:58:07+5:302024-10-01T22:00:13+5:30

Thane News: महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे. ही संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे. सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

Thane: Protecting Sanatan Dharma is our responsibility, Chief Minister Eknath Shinde  | सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

 मीरारोड - महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे . हि संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे . सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन आयोजित केले होते . सोमवारी मुख्यमंत्री यांनी उपस्थित जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज , द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानन्द सरस्वती जी महाराज, अनिरुद्धाचार्य महाराज , गजानन ज्योतकर गुरूजी आदींचे आशीर्वाद घेतले . यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत , खासदार नरेश म्हस्के , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , माजी मंत्री कृपाशंकर सिंह , माजी आमदार गिलबर्ट मेंडोन्सा व  रवींद्र फाटक , उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह , युवासेनेचे पूर्वेश सरनाईक , माजी नगरसेविका परीशा सरनाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदी उपस्थित होते . 

पालघर भागातील साधूंच्या हत्येची घटना घडली त्यावेळेचे सत्ताधीश गप्प बसले होते .पण आमच्या राज्यात साधूना हात लावायची कोणाची हिम्मत होणार नाही . गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याने गोरक्षा होणार , गोशाळांना अनुदान मिळणार , गाईला चारा साठी प्रति दिवस ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले . बाळासाहेबांचे हिंदुत्व व तत्व ज्यांनी विकले त्यांचे अस्तित्व जनता मिटवेल. जो हिंदुत्वाचा  पुरस्कार करेल तो बाळासाहेंबाच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा टोला त्यांनी माज़ीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला . 

देशात आता पर्यंत अनेक प्रधानमंत्री ,  मुख्यमंत्री झाले पण गाईला  राज्यमातेचा दर्जा देण्याची हिम्मत दाखवणारे एकनाथ शिंदे आजच्या घडीला देशात एकच छप्पन इंच छाती असणारे आहेत . सनातन धर्माचे प्रतीक वृषभ म्हणजेच बैल आहे . राजस्तंभावर बैलाचे चिन्ह आहे . संसदेच्या उदघाटन वेळी पंतप्रधान यांनी  हातात सोन्याचा राजदंड घेऊन प्रवेश केला . त्या राजदंडावर देखील बैलाला स्थान आहे .  मग त्याला कापण्याची , तुकडे करून पॅकेट मध्ये भरण्याची , त्याच्या विक्रीतून आलेले पैसे तिजोरीत भरण्याची हिम्मत कसे काय देशाचा प्रधानमंत्री करू शकतो ? असा सवाल यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला . 

आम्हाला गौमतदाता बनायचे आहे. गाई साठी जो उमेदवार व पक्ष उभा राहील त्यांच्यासाठी आपण मनमोकळेपणे मतदान करायचे आहे . केंद्र सरकारने पण गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा ; देशाच्या अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पण तसे करावे . देशातील बहुसंख्यांकच्या भावनांचा सन्मान अल्पसंख्यांक यांना करावा लागेल . अन्यथा जगात त्यांचे ५६ देश आहेत . कोणी जर गौमातेच्या निर्णया बद्दल प्रश्नचिन्ह करेल तर त्याच्या नेतृत्वाचा अधिकार संपवून टाका असे आवाहन अविमुक्तेश्वरानंद यांनी केले . 

Web Title: Thane: Protecting Sanatan Dharma is our responsibility, Chief Minister Eknath Shinde 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.