ठाण्याचै येऊर, उपवनच्या जंगलाच्या साफसफाईसाठी आमदारांसह वाढता लोकसहभाग !
By सुरेश लोखंडे | Updated: October 1, 2023 16:30 IST2023-10-01T16:29:44+5:302023-10-01T16:30:34+5:30
३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच व प्लास्टिक जमा..

ठाण्याचै येऊर, उपवनच्या जंगलाच्या साफसफाईसाठी आमदारांसह वाढता लोकसहभाग !
ठाणे : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आमदार संजय केळकर,त्यांचे कार्यकर्ते आणि लोकसहभागातून येथील येऊर व उपवनातील काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक, कागद आदी गोळा आज गोळा करण्यात आले.त् यामुळे बकाल झालेल्या येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच, प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली. यावेळी तब्बल ३० मोठया पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवडा ठाण्यात सुरु असून त्यासह महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियान करिता आवाहन केले होते आणी दोनच दिवसाच्या आवाहनाला 400 च्या वर नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मोठया प्रमाणात ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि १६ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवले. वास्तविक येऊर म्हणजे निसर्गाचे वरदान लाभालेला.