ठाणे वर्षा मॅरेथॉन : एक धाव शाळेसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:45 AM2017-08-10T05:45:57+5:302017-08-10T05:45:57+5:30
येत्या रविवारी होणाºया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्र ीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत.
ठाणे : येत्या रविवारी होणाºया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्र ीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत. स्मार्ट सिटीतली स्मार्ट शाळा हे त्यांचे घोषवाक्य आहे.
‘एक धाव शाळेसाठी’ हा विचार मनात बाळगून ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा या माजी विद्यार्थ्यांचा मनसुबा आहे. या शाळेची माजी विद्यार्थिनी अस्मिता चितळे हिने जिम्नॅस्टिक खेळात क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे.
गेली अनेक वर्षे शाळा, बास्केटबॉल जिम्नॅस्टिक, व्हॉलिबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी आणि खोखो या खेळांत राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात शाळेचे अनेक आजीमाजी विद्यार्थी नावारूपाला आले आहेत. या सर्वांची माजी विद्यार्थ्यांना ओळख व माहिती व्हावी, यासाठी विशेष कार्यक्र म संस्थेच्या क्रीडा संकुलाच्या सभागृहात त्याच दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत आयोजित केला आहे. या वेळी शाळेचे आजी विद्यार्थी आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन आणि धावपटूंचे स्वागत आणि गौरव करतील.
या स्पर्धेत आणि त्या निमित्ताने आयोजित होणाºया विशेष कार्यक्र मात जास्तीतजास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेचे माजी विद्यार्थी विवेक जोशी, निनाद नातू, अनिता थत्ते वैदेही आणि राजश्री यांनी केले आहे.
या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य
पन्नाशीच्या आसपासचे माजी विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १९८४ च्या बॅचचे हे विद्यार्थी आहेत. जवळपास २५ माजी विद्यार्थी यात असतील. अर्ध मॅरेथॉन या प्रकारात हे विद्यार्थी धावतील, असे सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.