कसारा गावात माळीणची पुनरावृत्ती, दरडीखाली सापडली सहा घरे, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:11 PM2021-07-22T12:11:03+5:302021-07-22T12:12:30+5:30
Thane Rain Update: शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने कसारा माळीण गावात झालेल्या दुर्घटनेकडे वाटचाल करित असल्याचे चित्र दिसले.
- शाम धुमाळ
कसारा - शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने कसारा माळीण गावात झालेल्या दुर्घटनेकडे वाटचाल करित असल्याचे चित्र दिसले. सुदैवाने ६ घरातील सर्व लोक बाहेर पळाले म्हणून बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Malin's recurrence in Kasara village, six houses found under rubble, fortunately no casualties)
सतत कोसळणा-या पावसामुळे बुधवार च्या मद्यरात्री पंचशील नगर .आनंदनगर,देऊळवाडी,निगडवाडी,शिवाजी नगर ,तानाजी नगर,परिसरात मोठ्या प्रमाणात घरांवर दरडी व मातीचा मलबा कोसळल्याने मोट्या प्रमाणात नुकसान झाले,तर या दरडी मुळे ६ घरे दडपली असून घरातील लहान मोठे सर्व जन घराबाहेर पळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही . गॅस,अंन्नधांन्य, शालेय साहित्य, सह महत्वाच्या वस्तुंची नासधूस झाली आहे या घटनेची दखल परिसरातील आनंद नगर ,पंचशील नगर,देऊळवाडी,निंगडवाडी, ठाकुरवाडी ,कोळीपाडा,तानाजीनगर, या ठिकाणी डोंगर पोखरुन नव्याने वाड्या वस्त्या उभ्या राहिल्या असुन डोंगर पोखरल्याने अनेक डोंगर टेकड्या कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टी मुळे कसा-याचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी. शहापुर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी वन जामिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक घरांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली, दरम्यान कसारा गावातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजन नसल्याने घरांची धोकादायक निर्माण झाला आहे.