Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
By नितीन पंडित | Published: April 11, 2024 10:14 AM2024-04-11T10:14:36+5:302024-04-11T10:14:59+5:30
Ramzan Eid: संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले.
- नितीन पंडित
भिवंडी - संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले. सकाळी सात वाजता पासुन शहरतील ईदगाह मैदाना सह तब्बल १०५ मशिदी मधून सामूहिक नमाज पठण करण्यास सुरवात झाली.
सर्वात शेवटी कोटर गेट येथील सुन्नी जामा मस्जिद येथे हजारो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली.नमाज नंतर सर्व भारतीयांसाठी दुवा करण्यात आली.कोटर गेट या ठिकाणी अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख ,पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी,पराग म्हणेरे यांनी मुस्लिम धर्मियांना गुलाब पुष्प देवून रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.तर सर्व नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत.