Thane: लग्नाच्या अमिषाने तरुणीवर बलात्कार: कथित पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मनसेने केला भंडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:39 PM2023-03-26T21:39:46+5:302023-03-26T21:40:09+5:30
Crime News: लग्नाच्या अमिषाने एका २० तरुणीला उत्तरप्रदेशातून पळवून आणून मुंबई आणि ठाण्यात बलात्कार करणाºया तसेच तिचा जबरदस्तीने गर्भपात करणा-या कथित पतीसह सहा जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे - लग्नाच्या अमिषाने एका २० तरुणीला उत्तरप्रदेशातून पळवून आणून मुंबई आणि ठाण्यात बलात्कार करणाºया तसेच तिचा जबरदस्तीने गर्भपात करणा-या कथित पतीसह सहा जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या पदाधिकाºयांनी हा प्रकार उघड केल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्हयात राहणाºया या २० वर्षीय पिडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या दरम्यान उत्तरप्रदेशातील आरोपीच्या दुकानात, मुंबईतील कांदिवली आणि ठाण्यातील वागळे इस्टेट येथील काजूवाडी भागात हा अत्याचाराचा प्रकार घडला. आरोपी विकास यादव (२३, रा. उत्तरप्रदेश) याने त्याच्या दुकानातील देवाच्या एका फोटोसमोर लग्न केल्याचे भासवून या पिडीतेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर उत्तरप्रदेशसह मुंबई ठाण्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती गरोदर राहिली. तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. कहर म्हणजे विकासचा मावसा रमेश यादव यानेही तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तसेच बनारस येथील हॉस्पीटलमध्ये रमेश यादव याने ती सहा महिन्यांची गरोदर असतांना तिच्या मनाविरुद्ध गर्भपातासाठी जबरदस्ती केली.
त्यानंतर हा गर्भपात होण्यासाठी तिला काजूवाडीतील घरी चंदन यादव, अजय यादव, विकासची मावशी आदींनी दूधात एक पावडर मिसळून तिला पिण्यास दिली. यातच रक्तस्त्राव झाल्याने तिचा गर्भपात झाल्याची आपबिती तिने आपल्या ओळखीतील एका तरुणाला सांगितली. त्याने हा प्रकार ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्या निदर्शनास आणला. मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात या पिडितेला शनिवारी आणले. तिने मोठया धाडसाने ही आपबिती कथन केली. तेंव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि विजय मुतडक यांनी चौकशी करुन याप्रकरणी २६ मार्च रोजी बलात्कारासह विनयभंग, पळवून आणणे, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला असून यातील आरोपींचा शोध घेण्यात असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.