'राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

By जितेंद्र कालेकर | Published: January 14, 2024 10:30 PM2024-01-14T22:30:07+5:302024-01-14T22:31:03+5:30

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Thane: 'Rather than what Ram eats, you have noticed what you eat', Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray | 'राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

'राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

- जितेंद्र कालेकर 

ठाणे - प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि
त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्याचवेळी राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलय, असा हल्लोबोलही  फडणवीस यांनी ठाण्यात राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला.

ठाणे येथील घोडबंदर भागातील आंनदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक. अयोध्येला कारसेवक म्हणून मला वयाच्या २० व्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी कार सेवेला गेलो होतो, तेव्हा तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता. तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनविणार असे ठणकावून सांगत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

अयोध्या कारसेवेत आमचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर करसेवक होते. तुमच्या सोबत असलेला एकजण तरी कारसेवेत होता, हे दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची  टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तुमच्यात हिम्मत असेल तर २२ तारखेला मंदिर उदघाटन सोहळ्याला या.  नाकारलेल्या रामाला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणतात माज्या वजनाने बाबरीचा ढाचा पडला असेल, पण त्यांना सांगू इच्छितो की, बाबरीचा ढाचा ही छोटी गोष्ट आहे. आम्ही रामसेवक असल्यामुळे आम्ही हिमालय पर्वत हलविण्याची ताकद ठेवतो, असेही ते म्हणाले.

राम काय खात होते हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. रामायणमध्ये मंथरा होती, तसे उद्धव ठाकरे यांच्याकडेही मंथरा आहे. मंथरामुळे तुमचे काय होईल माहीत नाही, असा टोला लगावत त्यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

ठाण्यातील कारसेवकांचा सत्कार
श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये मारुती शेळके, अंजली शेळके, प्रमोद घोलप, मोहन नाणे, अनिरुध्द साठ्ये, सुजित साठ्ये, डॉ. अंजली गांगल यांचा समावेश होता.

Web Title: Thane: 'Rather than what Ram eats, you have noticed what you eat', Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.