ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

By अजित मांडके | Published: June 30, 2023 07:43 PM2023-06-30T19:43:39+5:302023-06-30T19:43:48+5:30

गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

Thane recorded 71.36 mm of rain in ten hours on Friday | ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

googlenewsNext

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ठाण्याला झोडपत असताना, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने दुपारी अडीच ते साडेतीन या एक तासात  सुमारे ३० मिमी जोरदार हजेरी लावली होती. तर गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने ३० जूनच्या दुपारपर्यंत एकूण ६४५.३४ मिमी नोंद केली आहे. या आकडेवारी वरून दुप्पट पाऊस झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळीपासून पाऊस येऊन जाऊन होता. त्यातच दुपारी एक तासात पडलेल्या पावसाने दहा तासात ७१.३६ मिमी नोंद केली. याचदरम्यान झाडे आणि झाडांच्या फांदयातून तुटून पडल्या घटनांची नोंद झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Thane recorded 71.36 mm of rain in ten hours on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.