ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी

By अजित मांडके | Published: September 16, 2022 07:22 PM2022-09-16T19:22:35+5:302022-09-16T19:24:29+5:30

गेल्या २४ तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली.

Thane recorded the highest rainfall of the year in one day, 95.49 mm in 9 hours | ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी

ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी

Next

ठाणे  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्र वारी ठाणे शहरात दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. अवघ्या नऊ तासात शहरात तब्बल ९५.९४ मीमी विक्रमी पावसाची नोंद झाली. या वर्षातील एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद शुक्रवारी झाली. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर वृक्ष आणि वृक्षाच्या फांद्या पडण्याच्या घटना दिवसभरात घडल्या. त्यातही रस्त्यावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु होती. खडय़ांमुळे या वाहतुकीला आणखी ब्रेक लागल्याचे दिसून आले. तसेच एक ठिकाणी टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले तर दोन घटनांमध्ये झाडांच्या फांदया दोन दुकानांसह एक चारचाकी गाडीवर कोसळल्या आहेत.

गेल्या २४ तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. गुरु वारी रात्नी सुरू झालेला पाऊस शुक्र वारी दिवसभर बरसतच होता. याचदरम्यान सकाळी ८.३० ते सांयकाळी ५.३० वाजेर्पयत म्हणजेच नऊ तासात तब्बल ९५.९४ मीमी विक्रमी पावसाची नोंद ठाण्यात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील वंदना, टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा, चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात, मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात आणि इतर ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. तर वंदनाच्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने पंप लावले होते, तसेच पालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी पाण्यात उभे राहून नागरीकांना सर्तक करतांना दिसून आले. सकाळ पासून पडणा:या या पावसामुळे शहरातील वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक मुख्य रस्त्यांवरील वाहतुक धिम्या गतीने सुरु होती. त्यात शहराच्या अनेक भागातील रस्त्यांना पडलेल्या खडय़ांमुळे देखील वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसून आले. दुपारी ४ वाजेर्पयत पावसाचा जोर दिसून आला. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि सखल भागातील पाण्याचाही निचरा झाला आणि वाहतुक काही अंशी रुळावर आल्याचे दिसून आले. तर मुंब्रा येथील पंजाब कॉलनी जवळ वृक्ष पडले होते. सावरकर नगर येथे झाडाची फांदी दोन दुकानावर तसेच वसंत विहार येथे झाडाची फांदी चारचाकी गाडी पडली होती. याशिवाय दिवा बेतवडे गाव येथे टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले असून ते झाड कापून बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती कक्षाने दिली. तर सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे दुपारच्या सत्रतील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान मागील वर्षी या दिवसार्पयत ३१६४.२७ मीमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतार्पयत २६६३.७५ मीमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले.
 

Web Title: Thane recorded the highest rainfall of the year in one day, 95.49 mm in 9 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.