ठाणे निवासी उपजिल्हाधिका सूर्यवंशींसह तीन प्रशासक बहिणींचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार रविवारी
By सुरेश लोखंडे | Published: March 8, 2018 07:25 PM2018-03-08T19:25:02+5:302018-03-08T19:25:02+5:30
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यंत एमएमआरडीए, निवडणूक निर्णय अधिकारी, रेशनिंग अधिकारी आणि आता ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असा त्यांचा प्रवास
ठाणे : एकाच घरातील या तिघी ‘सूर्यवंशी’ बहिणी प्रशासनाच्या अत्यंत महत्वाच्या पदावर समर्थपणे सेवा बजावत आहेत. येथील ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) वंदना सूर्यवंशीसह निलिमा आणि माधवी सूर्यवंशी या बहिणींची अद्भुत आणि प्रेरणादायी यशोगाथा ‘महिला’ दिनाच्या निमित्ताने रविवारी ११ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी ११वाजता उलगडणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यंत एमएमआरडीए, निवडणूक निर्णय अधिकारी, रेशनिंग अधिकारी आणि आता ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असा त्यांचा प्रवास आहे. कुणाचाही दबाव न जुमानता नियमांवर बोट ठेऊन काम करणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ‘निवासी उपजिल्हाधिकारी’ पदावर काम करणा-या त्या राज्यातील एकमेव महिला अधिकारीआहेत.
निलिमा सूर्यवंशी यांचा नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश झाला. भिवंडीत पुरवठा अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. कुर्ल्यासारख्या संवेदनशील भागात अतिक्र मण विरोधी अधिकारी म्हणूनही त्यांनी धडक काम केले. कर्तव्य कठोर तरीही माणुसकीचा हळवा कोपरा जपणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महिला अधिका-यांचे हक्क, त्यांना मिळणााºया सुविधा यासाठी त्या आग्रही आहेत. सध्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये तहसीलदार म्हणून त्या सेवा बजावत आहेत.
याप्रमाणेच माधवी सूर्यवंशी गट विकास अधिकारी म्हणून त्यांची कारिकर्दी सुरु झाली. कुपोषणासंदर्भात त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. नंतर त्यांची विक्र ी कर विभागात निवड झाली. सहायक विक्र ी कर आयुक्त आणि आता विक्र ीकर उपयुक्त असा त्यांचा प्रवास आहे. सध्या त्या नव्या अधिका-यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. विशेष म्हणजे हे काम त्यांनी स्वत:हून मागून घेतलेआहे. एकाच घरातील तिघी बहिणी प्रशासनात जाण्याचा हा दुर्मिळ योग. या तिघींचे घडवणारे त्यांचे आई वडील, त्यांचे बालपण, शिक्षण, प्रशासनात त्यांनी केलेला संघर्ष असा लखलखता प्रवास ठाण्यात उलगडणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वेगळ्या वाटेवरच्या मुलाखतीचा लाभ घ्यावा.