ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४५ फिर्यादींना हस्तांतरीत केला एक कोटी २५ लाखांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 09:48 PM2020-01-07T21:48:54+5:302020-01-07T22:00:00+5:30

ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीणमधील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील रोकड आणि दागिन्यांसह सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी सेवापदके परत मिळाल्याने लष्कारातील माजी अधिकारीही भावूक झाला होता.

 Thane Rural Police handed over property of 1.25 Lackh to 45 Complainants | ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४५ फिर्यादींना हस्तांतरीत केला एक कोटी २५ लाखांचा मुद्देमाल

चोरीतील सेवापदके परत मिळाल्याने लष्करातील अधिकारी झाला भावूक

Next
ठळक मुद्देचोरीतील सेवापदके परत मिळाल्याने लष्करातील अधिकारी झाला भावूक दागिनेही पुन्हा मिळाल्याने किन्हवलीची गृहिणीही भारावली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चोरी आणि जबरी चोरीतील एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा ऐवज ४५ फिर्यादींना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते मंगळवारी अभिहस्तांतरण करण्यात आला. जबरी चोरीतील पदके आणि दोन लाखांची रक्कम पोलिसांनी परत केल्यानंतर लष्कारातील माजी अधिकारी सनी थॉमस यांनी समाधान व्यक्त करतांनाच भावूक झाले होते.
ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हयातील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्रे, सोनसाखळी, कर्णफुले, बे्रसलेट, कानाच्या रिंगा, झुमके आणि इतर ) तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.


यावेळी मौल्यवान मंगळसूत्रांसह मौल्यवान दागिने, मोबाईल, मोटारसायकली आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. अंबरनाथ येथील कुळगाव येथील रहिवाशी असेलेले सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट सनी थॉमस यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. थॉमस यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपली सेवा बजावल्याने त्यांना चांगल्या कामगिरीबद्दलची सेवा पदके मिळाली होती. त्यांच्याकडे झालेल्या या मौल्यवान पदकांसह दोन लाखांची रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात उघडकीस आणली होती. या प्रकरणात नवी मुंबईतून तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील पदकांसह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. पण निवृत्तीनंतर मिळालेली दोन लाखांची जमा पुंजी समाजकार्यासाठी उपयोगात आणायची होती. शिवाय भारत पाक सीमेमवर बजावलेल्या कर्तव्यापोटी केंद्र सरकारकडून मिळालेले पदक हीच एक मोठी संपत्ती होती. तीही चोरी झाली होती. ती पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या पथकाचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस मेहनत घेऊन गुन्हा कसा उघडकीस आणतात याचा चांगला अनुभव आल्याचे सांगतांनाच त्यांना गहिवरुन आले. तसेच घरातील चोरीतून चोरटयांनी आयुष्यभराची कमाई चोरुन नेली होती. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा सर्व साडे चार तोळयांचा ८८ हजारांचा ऐवज परत मिळवून दिल्याचे किन्हवली येथील वैशाली देशमुख यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. देशमुख यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. तिचा किन्हवली पोलिसांनी यशस्वी तपास केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक नाईक, मीरा रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 

नोकरांना काम देतांना काळजी घ्या- डॉ. राठोड
आपल्या मालमत्तेची कशा प्रकारे सुरक्षा घ्यायची याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही तसेच अनोळखी व्यक्तीला कोणतेही काम देतांना किंवा नोकरीवर ठेवतांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जातांना आपल्या घराची कशा प्रकारे सुरक्षा घ्यावयाची याबाबत अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

Web Title:  Thane Rural Police handed over property of 1.25 Lackh to 45 Complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.