Thane: संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय मराठे यांचे निधन
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 15, 2024 23:30 IST2024-12-15T23:25:31+5:302024-12-15T23:30:31+5:30
Thane News: संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे आज रात्री ९.५५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

Thane: संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय मराठे यांचे निधन
-प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे आज रात्री ९.५५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी उद्या १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जवाहरबाग स्मशानभूमीत होणार आहे.
पंडित राम मराठे यांचा वारसा संजय मराठे यांनी सुरू ठेवला. त्यांचे वडील हेच त्यांचे शिष्य होते. लहानपणापासून गोविंद पटवर्धन यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले. राम मराठे यांना त्यांनी अनेक वेळा साथ सांगत केली होती. त्यांची दोन्ही मुले प्राजक्ता आणि भग्येश त्यांची परंपरा चालवत आहे. त्यांचे छोटे बंधू मुकुंद मराठे हे देखील त्यांच्याकडेच गाणे शिकले होते. मराठे परिवार हा ठाणे पूर्व येथील नादब्रह्म येथे वास्तव्यास आहेत. १००० हून अधिक त्यांनी कार्यक्रम केले. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. मुकुंद मराठे आणि त्यांनी मिळून मंदरमाला हे नाटक बसविले. त्याचे आज देखील प्रयोग सुरू आहेत. पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी १०० कार्यक्रम केले. नुकत्याच झालेल्या पंडित राम मराठे महोत्सवच्या बैठकीला ते उपस्थित होते.