Thane: शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांची मागणी

By जितेंद्र कालेकर | Published: December 26, 2022 05:15 PM2022-12-26T17:15:41+5:302022-12-26T17:16:22+5:30

Thane : छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाºया प्रवृत्तीमागे कोणते षडयंत्र आहे का? याची सखोल चौकशी विशेष तपास पथकामार्फतीने ( एसआयटी) केली जावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केली आहे.

Thane: SIT probe those who insulted Shiv Raya! Shiv Sena Thackeray group's sub-district chief Sanjay Ghadigaonkar demands. | Thane: शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांची मागणी

Thane: शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांची मागणी

googlenewsNext

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाºया प्रवृत्तीमागे कोणते षडयंत्र आहे का? याची सखोल चौकशी विशेष तपास पथकामार्फतीने ( एसआयटी) केली जावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केली आहे. यामागे नेमका काय कट शिजतोय याचाही शोध घ्यावा, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान आणि आराध्य दैवत आहे. शिवरायांचा अपमान भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांच्या माध्यमातून वारंवार होत आहे. मरत्र, त्या नेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. यामागे काही कटकारस्थान आहे का? महाराजांची बदनामी करून महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे का? हा एका दूरगामी कटाचा भाग आहे का? राज्यपालही महाराजांची बदनामी वारंवार करीत आले आहेत. त्यांच्यावरही कोणतीही कारवाई केंद्राने किंवा भारतीय जनता पार्टीने केलेली नाही. परिणामी, राज्य सरकारने एसआयटी नेमून सखोल चौकशी करावी, अशी मागणी घाडीगावकर यांनी केली आहे.

Web Title: Thane: SIT probe those who insulted Shiv Raya! Shiv Sena Thackeray group's sub-district chief Sanjay Ghadigaonkar demands.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.