ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:36 PM2021-06-27T18:36:52+5:302021-06-27T18:38:27+5:30

Ganeshotsav Thane : गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी. राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन.

Thane A solution soon Guardian Minister assures Ganeshotsav committee coronavirus pandemic | ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

Next
ठळक मुद्देगणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी.राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन.

ठाणे : गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न झाल्या नंतर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा करून प्रमुख तीन मुद्दे मांडले यावर राज्य शासनाशी चर्चा करून लवकरच तोडगा काढू असे आश्वसन समितीला दिले.

गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवावीत, कोरोनाचे नियम पाळून आगमन विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लवकरात लवकर लसीकरण होईल अशी योजना आखावी, हे तीन मुद्दे शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत समितीने मांडले. तसे, निवेदनही त्यांना दिले. 

राज्य सरकारशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास सुरुवात असल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी समितीने यावेळी घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांच्यासह प्रशांत शेवाळे, विशाल सिह , किरण जाधव, प्रवीण, तुषार पेठकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Thane A solution soon Guardian Minister assures Ganeshotsav committee coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.