होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

By अजित मांडके | Published: March 18, 2024 07:01 PM2024-03-18T19:01:04+5:302024-03-18T19:01:40+5:30

ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडीतून गाड्या सुटणार

Thane ST Division ready for Holi; Planning of 126 additional trains from the district | होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

ठाणे : शिमग्याला हमखास चाकरमानी हे आपल्या गावी जातात. त्यामुळे नेहमीच मुंबई - ठाण्यातील चाकरमान्यांना सुखरूप या सणांना सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदा ही सज्ज झाले. यावेळी तब्बल १२६ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये आरक्षणाच्या १०६ तर ग्रुपच्या २० गाड्यांचा समावेश आहे. तर यंदा १२ गाड्या वाढण्यात आल्या. तसेच ठाणे-२ या एकाच आगारातून सर्वाधिक 39 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या २२ ते २६ मार्च दरम्यान गाड्यांचे नियोजन असून चाकरमान्यांनी गावी जाताना आपले तिकीट आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.         

येत्या २४ मार्चला होळी आणि २५ मार्चला धुळवड झालेली आहे. त्यामुळे कोकणात होळीला जाणाऱ्यांची लगबग लक्षात घेत एसटीच्या ठाणे विभागाने चांगली कंबर कसली असून येत्या २२ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले गेले आहे. तर २३,२४,२५ आणि २६ मार्च रोजी जास्त जादा गाड्या सोडण्यावर भर दिला गेला आहे. त्या आठवड्यात ठाणे -१ आगारातून २९, ठाणे-२ आगारातून ३९, कल्याण आगारातून २३ आणि विठ्ठल वाडी आगारातून ३१ अशा १२२ गाड्या सोडण्यात आला. या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. चाकरमान्यांनी होळी सणाला जाण्यासाठी खिडकी तसेच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा. 

या आगारातून सुटणार या गाड्या
ठाणे -१
महाड, पाली, कावळा, पोलादपूर, चिपळूण,मंडणगड, दुर्गेवाडी-मंजूत्री, कासे माखजन, दापोली
ठाणे-२
शिरगाव,फौजी अंबावडे,चिपळूण,शिवथरघळ,
 बीरमणी, कोतवाल,दापोली, महाड, खापरपा, शिंदी,गुहागर, खेड, देवळी,भेदवाडी
*कल्याण
पोलादपूर, कोतवाल, दिवेआगार, फौजी अंबावडे, शिवथरघळ, खेड,चिपळूण, दापोली
*विठ्ठल वाडी
चिपळूण, तळीये,दापोली,ओंबळी, गुहागर,मुरुड,रत्नागिरी,काजूर्ली, कासे माखजन, गराटे वाडी, दापोली,साखरपा.
............... .. 
ठाणे विभाग
दिनांक            आरक्षण     ग्रुप 
२२/३/२०२४  - ३२      ०     ०८
२३/३/२०२४  -  ४६    -     १०
२४/३/२०२४   - १९      -     ००
25/३/२०२४  - ०५     -      ००
२६/३/२०२४   -  ०४        -    ०२
एकूण  -  १२६  -  १०६     -  २०

Web Title: Thane ST Division ready for Holi; Planning of 126 additional trains from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.