Thane: राज्यातील पहिल्या सौर ऊर्जेवरील कार्बन न्यूट्रल व्हिलेज प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ
By नितीन पंडित | Published: March 11, 2024 06:59 PM2024-03-11T18:59:47+5:302024-03-11T19:00:03+5:30
Bhiwandi News: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम सुराज्य अभियान अंतर्गत सौर उर्जे वरील कार्बन न्युट्रल ग्राम अभियाना राबविले जात आहे.या प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी गावांमध्ये भिवंडी तालुक्यातील दुधनी वाफे या दोन आदिवासी गावांची निवड करण्यात आली.
- नितीन पंडित
भिवंडी - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम सुराज्य अभियान अंतर्गत सौर उर्जे वरील कार्बन न्युट्रल ग्राम अभियाना राबविले जात आहे.या प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी गावांमध्ये भिवंडी तालुक्यातील दुधनी वाफे या दोन आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते तर दुधनी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,अतिरिक्त गटविकास अधिकारी इंद्रजित काळे,महाप्रित संस्थेचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे,धनाजी काळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या नावीन्यपूर्ण प्रकल्पात या दोन्ही गावातील ८०५ कुटुंबीयांना सौर ऊर्जा उपलब्ध होणार असून महाप्रित संस्थेतर्फे हा प्रकल्प उभा करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.ग्रामपंचायत मालकीच्या या योजनाचे नियंत्रण ग्राम ऊर्जा समिती करणार असून सौर उर्जे द्वारे उत्पादित वीज महावितरणच्या रोहीत्रा मार्फत सर्व ग्रामस्थांना वितरित होणार असून यामध्यामातून अतिरिक्त होणारी वीज खरेदी केल्यानंतर महावितरण कंपनी ग्रामपंचायतीस पैसे देणार आहेत.ज्याचा उपयोग ग्राम विकासासाठी होणार आहे अशी माहिती महाप्रित संस्थेचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे यांनी दिली आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाप्रित संस्थे तर्फे सर्व कुटुंबीयांना निरधूर चुलीचे वितरण होणार असून त्याचा शुभारंभ आज दहा कुटुंबीयांना मान्यवरांच्या शुभहस्ते निरधूर चुली देऊन करण्यात आला.