ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा हवा

By admin | Published: March 7, 2016 02:15 AM2016-03-07T02:15:44+5:302016-03-07T02:15:44+5:30

भारतात सर्वप्रथम वाडीबंदर-ठाणे मार्गावर १६ एप्रिल १९५३ ला रेल्वे धावली. त्यामुळे वाडीबंदर/सीएसटीएवढेच ठाणे स्थानकालाही महत्त्व आहे.

Thane Station has historic status | ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा हवा

ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा हवा

Next

डोंबिवली : भारतात सर्वप्रथम वाडीबंदर-ठाणे मार्गावर १६ एप्रिल १९५३ ला रेल्वे धावली. त्यामुळे वाडीबंदर/सीएसटीएवढेच ठाणे स्थानकालाही महत्त्व आहे. या स्थानकाला १६३ वर्षे पूर्ण होऊनही अद्याप त्याचा ऐतिहासिक (हेरिटेज) स्थानकांमध्ये समावेश झाला नाही, अशी खंत खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे व्यक्त केली. विचारे यांनी बुधवारी प्रभू यांची दिल्लीत भेट घेतली.
ठाणे-वाशी हार्बर मार्गावर सुविधा, जादा लोकल, मुख्य मार्गावरील ठाणे-दिवा ५/६ व्या मार्गांच्या खोळंबलेल्या कामाला गती मिळावी, ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या काही जागेवर नवे स्थानक, दिवा स्थानकात कोकणच्या गाड्यांना थांबा, ठाणे स्थानकात राज्यराणीसह दुरांतोला थांबा, ठाणे स्थानकातून कल्याणपुढे लोकल शटल सेवा आदी मुद्यांवर उभयतांनी सविस्तर चर्चा केली. अर्थसंकल्प सादर झाला असला तरीही प्रवाशांचे गाऱ्हाणे मांडले जावे, असा आग्रह ठाणे, दिवा, कल्याण-कसारा, कर्जत, वांगणी, उल्हासनगर आदी ठिकाणच्या रेल्वे प्रवासी संघटनांनी विचारेंकडे धरला होता. त्यानुसार, त्यांनी प्रभूंकडे समस्यांचा पाढा वाचला. (प्रतिनिधी)

Web Title: Thane Station has historic status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.