ठाणे स्थानकाची ओळख भावी पिढीला होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:53+5:302021-04-02T04:42:53+5:30
सध्या ठाणे स्थानकात ११ फलाट असून, मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे ऐतिहासिक ठाणे ...
सध्या ठाणे स्थानकात ११ फलाट असून, मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे ऐतिहासिक ठाणे स्थानकाची ओळख पटविणारे हे वाफेवरील पुरातन इंजिन ठाणे स्थानकात विराजमान व्हावे, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघाद्वारे केली होती. तेव्हा उत्तरोत्तर विस्तारत असलेल्या ऐतिहासिक ठाणे शहरातील टाऊन हॉल, अशोक स्तंभ आदी विविध बाबींचे जतन करून जुन्या आठवणींना उजाळा देणारे केळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. तसेच ब्रिटिशकालीन रेल्वे इंजिन जतन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्येही रेल्वेमंत्र्याची भेट घेतल्यानंतर त्यांनीही सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार हे रेल्वे इंजिन ठाणे स्थानक परिसरात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी जागेची निश्चिती करून अखेर खडतर प्रयत्नानंतर ठाणेकरांचा हा प्राचीन ठेवा ठाणे स्थानकात जतन होत असल्याचे केळकर यांनी सांगितले.
--------------