ठाणे सुपर स्पेशालिटीची ग्रीन बिल्डिंग ३१४ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:57 AM2019-06-16T00:57:34+5:302019-06-16T00:57:48+5:30

खर्चास शासनाची प्रशासकीय मान्यता; सर्व कामांसाठी एकाच निविदेचे बंधन

Thane Super Specialty Green Building 314 Crore | ठाणे सुपर स्पेशालिटीची ग्रीन बिल्डिंग ३१४ कोटींची

ठाणे सुपर स्पेशालिटीची ग्रीन बिल्डिंग ३१४ कोटींची

Next

- नारायण जाधव

ठाणे : अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ५७४ खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला असून राज्याच्या आरोग्य खात्याने अखेर या हॉस्पिटलसाठी ३१४ कोटी ११ लाख १९ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास अखेर मान्यता दिली आहे. या मंजुरीनुसार नवी इमारत सहा माळ्यांची राहणार असून राज्य शासनाच्या नव्या मानकांनुसार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ही इमारत खऱ्या अर्थाने ग्रीन बिल्डिंग राहणार आहे. या इमारतीत सोलार पॉवर सिस्टीमसह रेनवॉटर हार्वेस्टिंग, पार्किंगसुविधा, मलनिस्सारण प्रकल्पांसह अंपगासाठी विशेष सुविधा राहणार आहेत. यासोबत परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारतही नव्याने बांधली जाणार आहे.

आता लवकरच तांत्रिक समितीसह सक्षम अधिकाºयाची मंजुरी घेऊन नव्या हॉस्पिटलची इमारती बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची इमारत ही ब्रिटिशकालीन असून १०० वर्षे जुनी आहे. मात्र, पुरशा देखभालीअभावी ती अतिशय जुनी झाली असून अनेकदा प्लॉस्टर, स्लॅब निखळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या सर्व इमारती पाडून त्याजागी नवे सुसजज्ज सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी मार्च २०१८ मध्ये इमारती पाडण्यास तर जुलै २०१८ मध्ये ५७४ खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या इमारतींचा खर्च १५ कोटींहून अधिक असल्याने त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची मान्यता घेऊन तसा प्रस्ताव शासनास सादर करून मंजुरी घेणे आवश्यक होते. मुख्य सचिवांच्या समितीने १० जून २०१९ रोजी मान्यता दिल्यानंतर लगेच १३ जून २०१९ रोजी शासनाने अटी आणि शर्थी घालून ३१४ कोटी ११ लाख १९ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली.

या असणार सुविधा
नव्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ही इमारत खºया अर्थाने ग्रीन बिल्डिंग असणार आहे. या इमारतीत सोलार पॉवर सिस्टीमसह रेनवॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग सुविधा, मलनिस्सारण प्रकल्पांसह अंपगासाठी विशेष सुविधा राहणार आहेत. यासोबत परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारतही नव्याने बांधली जाणार आहे. तसेच गॅस पाइपलाइन, अंतर्गत रस्ते, लॅण्डस्केप गार्डन यासह ग्रीन बिल्डिंगसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्वांचा समावेश राहणार आहे.

या आहेत अटी व शर्थी
हॉस्पिटल बांधण्यासाठी निविदा मागविण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागााच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून तांत्रिक मान्यता घेणे.
बांधकाम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञांकडून तिचे नकाशे मंजूर करून घेणे.
हॉस्पिटल आणि तत्सम कामांसाठी वेगवेगळ्या निविदा न मागविता एकच निविदा मागविणे.
नकाशानुसार जागा उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे.
पर्यावरण विभागाने आखून दिलेल्या मानकानुसारच इमारतींचे बांधकाम करून तशा परवानग्या घेणे.

Web Title: Thane Super Specialty Green Building 314 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.