Thane: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या, शंभूराज देसाई यांची सूचना   

By सुरेश लोखंडे | Published: October 3, 2024 11:46 PM2024-10-03T23:46:12+5:302024-10-03T23:46:51+5:30

Thane News: ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत.

Thane: Take proper care of women sisters in the Prime Minister's program;  Be kind! - Shambhuraj Desai    | Thane: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या, शंभूराज देसाई यांची सूचना   

Thane: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या, शंभूराज देसाई यांची सूचना   

ठाणे  - ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या; त्यांना घरातील भगिनींप्रमाणे सौहार्दाची वागणूक द्या; असा मोलाचा सल्ला या दौऱ्याचे कार्यक्रम  पूर्व तयारीचा आढावा घेताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्यांना  गुरूवार रात्री वालावलकर मैदान, बोरीवडे या प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी दिला.

या वेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होत आहे. शिस्तबद्धतेने सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करूया. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्यावी. आपल्या घरातील महिलेला जशी वागणूक दिली जाते तशी सौहार्दाची वागणूक प्रत्येक महिला भगिनींना द्यावी, असे स्पष्ट करून देसाई यांनी मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकार्यांना दिल्या.

पंतप्रधानांच्या  या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे देसाई यांनी ही बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे,अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, , पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाठ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे विकास औटे यांच्यासह विविध विभागांचे, कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, स्वच्छ्ता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीपूर्वी देसाई यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची पाहणीही केली.

Web Title: Thane: Take proper care of women sisters in the Prime Minister's program;  Be kind! - Shambhuraj Desai   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.