मद्यविक्रेत्यांनी थकविले ठाणे महानगरपालिकेचे 229 कोटी, ज्वेलर्सवाल्यांची थकबाकी 15 कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:43 PM2017-10-09T14:43:22+5:302017-10-09T14:46:03+5:30
ठाणे महापालिकेत जकात बंद झाली असली तरी अद्याप जकातीपोटी मद्यविक्रेत्यांनी तब्बल 229 कोटींची थकबाकी ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पालिका तिजोरीत काही पैसाच नसल्याचे सांगत असून विविध करात वाढ करीत आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेत जकात बंद झाली असली तरी अद्याप जकातीपोटी मद्यविक्रेत्यांनी तब्बल 229 कोटींची थकबाकी ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पालिका तिजोरीत काही पैसाच नसल्याचे सांगत असून विविध करात वाढ करीत आहे. परंतु या कोटय़ावधींच्या थकबाकीसाठी काहीच करीत नसल्याचा आरोप ठाणो मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला आहे. शिवाय ठाण्यातील ज्वेलर्स वाल्यांनी देखील 2010 - 13 या कालावधीत पालिकेचे तबल 15 कोटी 96 लाख 51 हजार 732 रु पये थकविले असल्याची माहिती अभियान चे संजीव साने, राजीव दत्ता यांनी दिली.
सामान्य माणसाने 100 रुपयाचा मालमत्ता कर थकविला तरी देखील पालिकेकडून तत्काळ जप्तीची नोटीस बजावली जाते. दंड लावून थकबाकी वसुल केली जाते. परंतु या थकबाकीदारांवर पालिकेचा आर्शिवाद कशासाठी असा सवालही या सदस्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात जकात रद्द करण्याचा निर्णय 2013 मध्ये घेण्यात आला होता. जकाती ऐवजी स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून वसुली सुरु झाली. परंतु जकातीपोटी असलेली थकबाकी वसुलीबाबतही पालिका कोणतेही कठोर पावले उचलतांना दिसत नाही. जकातीपोटी याच कालावधी शहरातील अनेक व्यापारी व कंपन्यांची जकातीची रक्कम पालिकेला मिळणो शिल्लक आहे. यामध्ये बार व रेस्टॉरेन्ट, वाईन शॉप, देशी, बिअर बार, बियर शॉपी आदींचा समावेश आहे. या व्यापा:यांपैकी 273 व्यापारी संस्थांना जकात कमी भरल्याची वसुली नोटीस दिली गेली. नंतर दावे दाखल केले गेले, याच काळात 40 व्यापारी संस्थांनी थकीत रक्कम भरली. इतर 10 संस्थांनी दंडा सहित रक्कम भरली. परंतु अद्यापही या व्यापा:यांकडून तब्बल 229 कोटी 24 लाख 1 हजार 692 रुपयांची थकीत येणो बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही वसुली कशी करावी याबाबत कोणतीच योजना पालिकेकडे नाही.
वॉईन शॉप - 163 कोटी 38 लाख 84 हजार 863,
देशी बार शॉप - 17 कोटी 94 लाख 8 हजार 949,
बार व रेस्टॉरेन्ट - 22 कोटी 53 लाख 60 हजार 476
बीअर शॉपकडून 25 कोटी 37 लाख 87 हजार 404 रुपयांची थकबाकी येणे शिल्लक
दुसरीकडे मद्यविक्रेत्यांसमवेत ठाण्यातील काही बडय़ा ज्वेलर्सवाल्यांनी देखील जकात बुडविली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार 2010 ते 2013 या कालावधी 15 कोटी 96 लाख 51 हजार 732 रुपयांची थकबाकी असून याची वसुली मात्र अद्यापही पालिकेला करता आलेली नाही.