Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

By सुरेश लोखंडे | Published: January 18, 2024 09:40 PM2024-01-18T21:40:31+5:302024-01-18T21:40:48+5:30

Thane News: ​​​​​​​ठाणे येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या.

Thane: Thane Zilla Parishad officers, employees' 'artwork', sports competition in jubilation! | Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

- सुरेश लोखंडे 
ठाणे - येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या. तर राम गणेश गडकरीं रंगायतनमध्ये बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या झाला आहे.सुदृढ आरोग्य  आणि आनंदी जीवनासाठी कार्यशील व प्रयत्नशील रहा , असे मार्गदर्शन यावेळी या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या या अधिकाराचा, कर्मचाऱ्यांना या प्रसंगी केले आहे.

आजच्या क्रीडा महोत्सव  मावळी मंडळ, चरई, ठाणे-प येथे संपन्न झाले.  जिंदल यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवण्यात आली. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, रस्सी खेच, क्रिकेट हे खेळ सांघिक पध्दतीने खेळले, वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, तीन पायांची शर्यत तर ५० वर्षावरील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ५० मिटर धावणे, जलद चालणे, तीन पायांची शर्यत अशा स्पर्धां घेण्यात आल्या. इनडोअर गेम मध्ये कॅरम व बुध्दीबळ हे दोन खेळ ठेवण्यात आले होते.  या सर्व स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा आज उशिरापर्यंत जल्लोषात पार पडला. विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगला.

 आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घ्या. दरवर्षी नवीन वर्षात संकल्प करून दररोज नव्याने सुरूवात करा. सर्व चांगल्या सवयीचा अंगिकार करा. उत्तम आरोग्य आणि आनंद यासाठी कार्यशील व प्रयत्नशील रहा असे मार्गदर्शन  जिंदाल यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले . या कार्यक्रमांसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक . छाया शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग  प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख पंडित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक .भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Thane: Thane Zilla Parishad officers, employees' 'artwork', sports competition in jubilation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे